Nashik News : शेतकरीच नवरा हवा गं बाई..! मुंबईतील उच्च शिक्षित तरुणीचा हट्ट

Nashik News : शेती व्यवसाय तोट्यात असल्याची बहुसंख्य शेतकऱ्यांची व्यथा असते. अशा परिस्थितीत शेतकरी तरुणांना विवाहासाठी मुली मिळण्यात खूप अडचणी येतात.
Amol Pagar and Nikita Pagar
Amol Pagar and Nikita Pagar esakal

मनोहर बोचरे : सकाळ वृत्तसेवा

देवगाव : शेती व्यवसाय तोट्यात असल्याची बहुसंख्य शेतकऱ्यांची व्यथा असते. अशा परिस्थितीत शेतकरी तरुणांना विवाहासाठी मुली मिळण्यात खूप अडचणी येतात. मुली शेतकरी नवरा नको ग बाई, असं म्हणत स्थळांना नकार देतात. हे वास्तव नाकारत मुंबईतील एका उच्चशिक्षित तरुणीने शेतकरी नवराच हवा असा हट्ट केला. (highly educated young woman from Mumbai insisted on wanting farmer husband)

तिच्या पालकांनी मोठ्या शहरातील चांगले स्थळ नाकारून मुलीची इच्छा पूर्ण केली. मुंबईत महिन्यापूर्वीच म्हाडामध्ये निरीक्षक पदावरून निवृत्त झालेले अनिल सखाराम बेळे यांना तीन मुली दोन्ही मुली नोकरीला असलेल्या मुलांना दिल्या. तिसरी निकिताला लाडात वाढवून इच्छेप्रमाणे शिक्षण दिले. सौंदर्य शास्त्रातील निकिताने पदवी घेतली.

तिला मोठ्या शहरातून अनेक स्थळ आली. चांगली खासगी नोकरी करणारे, व्यावसायिक, पैसा, बंगला असलेले अनेकांची स्थळ आली. पण मला शेतकरी नवराच हवा असा हट्ट तिने केला. लेकीचा हा हट्ट वडिलांनी पूर्ण केला. मुखेड (ता.येवला) येथील अमोल पगार या शेतकरी युवकाशी निकिताच लग्न नुकतंच पार पडलं. (latest marathi news)

Amol Pagar and Nikita Pagar
Nashik City Transport : शहरात पुन्हा ‘टोईंग’ सुरू; बेशिस्तांना बसणार दणका

वर अमोल पगार हाही उच्चशिक्षित असला तरी शेतीची आवड असल्याने त्याने शहराचा मार्ग न धरता फळबागेची उत्कृष्ट शेती करून परिसरात आदर्श निर्माण केला आहे. निकिता व तिच्या वडिलांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून,त्यांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला.

"माझे जन्म, बालपण, शिक्षण असा २४ वर्षाचा काळ मुंबईत गेला. मला व्यावसायिक, नोकरीवाले, पैसा, बंगला असलेले स्थळे आली. परंतु मला खेड्यातील शेतकरी मुलगा हवा होता. आज मुंबईचे वातावरण दूषित झाले आहे मात्र गावाकडे शुद्ध हवा, सेंद्रिय भाजीपाला मिळतो. मला शेतीत काही कळत नाही मात्र मला शेतीची आवड असल्याने मी आनंदाने शेती करायला तयार आहे." - निकिता पगार,नववधू

"ग्रामीण भागात शेतकरी मुलगा नको ही सर्रास मानसिकता आहे. त्यामुळे शेतकरी मुलाला मुलगी द्यायला कुणी तयार नाही. मात्र मुलीची इच्छा व तिच्या वडिलांचा मोठेपणा यामुळे तिचा अमोलशी शुभविवाह झाला. शेतकरी बांधवांना विनंती आहे त्यांनी ही मानसिकता बदलायला हवी." - साहेबराव पगार, वरपिता

Amol Pagar and Nikita Pagar
Nashik Onion Export : कांदा निर्यातीबाबत सुधारणा नक्की होतील : फडणवीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com