Holi 2024 : रंगोत्सवाचे वेध, 10 दिवस आधीच रहाड दुरुस्ती; डागडुजीसह विविध कामांना सुरवात

Holi : तीन दिवसांवर होळी येऊन ठेपली आहे. रंगप्रेमींना रंगपंचमीचे वेध लागले आहे. त्यानिमित्ताने तिवंधा येथील रहाड दुरुस्तीसाठी रंगपंचमीच्या दहा दिवस अगोदरच उघडी करण्यात आली आहे.
Rahad in Tiwandha Chowk opened for repair
Rahad in Tiwandha Chowk opened for repairesakal

Holi 2024 : तीन दिवसांवर होळी येऊन ठेपली आहे. रंगप्रेमींना रंगपंचमीचे वेध लागले आहे. त्यानिमित्ताने तिवंधा येथील रहाड दुरुस्तीसाठी रंगपंचमीच्या दहा दिवस अगोदरच उघडी करण्यात आली आहे. डागडुजी करून रंगरंगोटी करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. ३०) शहरात रंगपंचमी साजरी होणार आहे. रंग खेळण्यासाठी पुरातन काळापासून रहाड रंगोत्सव संस्कृतीस अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. (nashik holi 10 days before start of various works marathi news)

पेशवेकालीन काळात साकारण्यात आलेल्या रहाडी आजही पेशवे काळाची आठवण करून देत आहे. रंगपंचमीच्या दिवशी नागरिकांना रंग खेळण्यासाठी रहाडी उघड्या करून दिल्या जातात. वर्षभर त्या बंद असतात. तिवंधा चौकातील अशाच प्रकारची रहाड संपूर्ण शहरात प्रसिद्ध आहे. विविध भागातील रंगप्रेमी या ठिकाणी रंग खेळण्यासाठी येत असतात. प्रचंड मोठ्या प्रमाणावर रहाडीवर गर्दी होत असते.

गेल्या वर्षी गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली होती. अशीही रहाड रंगपंचमीच्या दहा दिवस अगोदरच उघडी करण्यात आली आहे. दरवेळी एक ते दोन दिवस अगोदर रहाड उघडी केली जाते. रहाडीच्या काही भागाची डागडुजी करावयाची आहे. त्यानंतर स्वच्छता करत रहाडीस रंगरंगोटी करण्यात येणार आहे. अशा विविध कामांसाठी काही दिवस लागणार आहे. वेळेवर धावपळ होऊ नये. यासाठी यंदा लवकर रहाड उघडण्यात आली आहे.  (latest marathi news)

Rahad in Tiwandha Chowk opened for repair
Holi 2024 : होळीची राख अंगावर का फासली जाते, काय आहे त्यामागील मान्यता?

बाजारपेठ सजल्या

तीन दिवसावर होळी येऊन ठेपल्याने नागरिकांना रंगपंचमीचे वेध लागले आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र रंगपंचमीच्या तयारीस वेग आला आहे. रंग, पिचकारी यांच्या बाजारपेठ सजल्या आहे. तर दुसरीकडे रहाड रंगोत्सवाची संस्कृती असल्याने रहाडीत रंग खेळणाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता विविध रहाड रंगोत्सवाचे आयोजकांकडून रहाडी संबंधित कामे करण्यास वेग आला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून तिवंधा रहाड दुरुस्तीसाठी उघडली आहे. त्या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये उघडलेली रहाड आकर्षण ठरत आहे. चारही बाजूंनी रहाडीस बॅरिकेटिंग करण्यात आली आहे.

Rahad in Tiwandha Chowk opened for repair
Holi 2024 : काहीतरीच काय! इथं होळीदिवशी पुरूषांकडून मार खाण्यासाठी महिला असतात उत्सुक, कारण...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com