empty market
empty market sakal

नाशिक : दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढल्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट

विविध व्यवसायांवर मोठा परिणाम; दुपारी रस्ते निर्मणुष्य

जुने नाशिक : दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत आहे. नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे विविध व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसापासून शहरातील तापमान अतिशय वाढले आहे. चाळिशीपर्यंत तापमान जात असल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहेत.

घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. कामानिमित्ताने बाहेर पडणारे नागरिक उन्हापासून संरक्षणासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहे. अन्य नागरिक मात्र घराबाहेर न पडण्याचे पसंत करत आहे, बाजारपेठेत खरेदीस जाणे तर दूरच. त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

काही ठिकाणी तुरळक अशी गर्दी असली तरी ती केवळ वीण कामाची गर्दी असल्याचे व्यावसायिकांकडून बोलले जात आहे. बाजारपेठेतील विविध व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दिवसभर व्यवसायिकांना केवळ ग्राहकांची वाट पाहत बसावे लागत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, वीजबिल अशा प्रकारचे दैनंदिन खर्च होत आहे, परंतु त्या तुलनेत व्यवसाय होत नाही. त्यामुळे प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून दिल्या जात आहे.

शहरातील मेनरोड, दहीपूल, शालिमार अशा विविध भागातील बाजारपेठेमध्ये अशीच परिस्थिती आहे. बहुतांशी रस्ते तर दुपारच्या सुमारास निर्मनुष्य दिसत आहे. याउलट सायंकाळी सहा वाजेच्या नंतर बाजारपेठेमध्ये काहीशी गर्दी होताना दिसत आहे. दोन दिवस रामनवमी आणि १४ एप्रिलला बाजारपेठेत काहीशी खरेदी विक्री झाल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. इतर दिवसांमध्ये मात्र उन्हामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याच्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहे.

रमजानच्या खरेदीकडे नजरा

गेले दोन वर्ष कोरोनामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. या वर्षी निर्बंध उठविण्यात आले आहे. व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आगामी रमजान आणि दिवाळीच्या खरेदीकडे व्यावसायिकांच्या नजरा लागल्या आहेत. दोन्ही सण व्यावसायिकांना काहीसे तारणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी उन्हाचा चटका कमी होण्याची आवश्यकता आहे. दिवाळीस अवकाश असला तरी रमजान अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. आगामी दिवसात अशाच प्रकारे उन्हाचा चटका जाणवत राहिला तर रमजानच्या खरेदीवरदेखील परिणाम होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com