
खळबळजनक! नाशिकमध्ये बंद गाळ्यात सापडले मानवी अवयव
नाशिक : नाशिकमधून एक खळबळजनक बातमी आली आहे. नाशिकमधील मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या एका बिल्डिंगमधील बंद गाळ्यामध्ये मानवी अवयव (Human Organs) सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी गाळ्याच्या मालकाकडे विचारणा केली असता त्याने याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. हा गाळा जवळपास पंधरा वर्षापासून बंद असल्याचा दावा या मालकाने केला आहे. याप्रकरणी आता पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा: प्रमोद सावंत घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; PM मोदींसह दिग्गजांची उपस्थिती
मेडिकल शिक्षणासाठी मानवी अवयवांचे संकलन केले जाते, अगदी त्याच पद्धतीने हे अवयव संकलन केलेले दिसून आलेले आहेत, त्यामुळे हा घातपात आहे की हे शिक्षणासाठी संकलित केलेले अवयव आहेत, याबाबत पोलिस तपास करत आहेत.
हेही वाचा: राज्यात उकाडा वाढणार, हवामान विभागाचा इशारा
15 वर्षांपासून गाळा बंद
नाशिक शहरामध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी एका सोसायटीच्या बंद गाळ्यामध्ये हे मानवी अवयव सापडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. वेगवेगळ्या बॉटलमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान असे वेगवेगळे मानवी अवयव ठेवण्यात आले आहेत. तर बादलीमध्ये देखील केमिकल प्रक्रिया करून मानवी अवशेष ठेवले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून आपण गाळे उघडले नाहीत, त्यामुळे आपल्याला काहीच माहित नसल्याचे गाळे मालकाने पोलिसांना सांगितले. गाळा मालकाच्या म्हणण्यानुसार पंधरा वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी या गाळ्यामध्ये स्थायिक होते. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
Web Title: Nashik Human Organs Found In Nashik Police Investigation Started
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..