

Nashik crime news love triangle Kasara Ghat dead body case
esakal
wife kills husband with lover : नाशिकमध्ये अनैतिक संबंधांत अडथळा ठरत असल्याच्या कारणातून महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तब्बल १८ तास घरात ठेवण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री कारमधून मृतदेह कसारा घाटात नेऊन फेकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
मृत व्यक्तीची ओळख वसंत गोरखनाथ सातपुते अशी झाली आहे. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने तपास करत कसारा घाटातून त्यांचा मृतदेह शोधून काढला.