IIT Delhi : आयआयटी दिल्‍लीने परीक्षा पुढे ढकलली

IIT Delhi : विद्यार्थ्यांनी केलेल्‍या आंदोलनानंतर आयआयटी व्‍यवस्‍थापनाने परीक्षा पुढे ढकलल्‍या आहेत.
IIT Delhi
IIT Delhi esakal

IIT Delhi : येथील वरद संजय नेरकर या विद्यार्थ्याने दिल्‍लीतील आयआयटीमध्ये आत्‍महत्‍या केल्‍याच्‍या घटनेने नाशिक ते दिल्‍ली सर्वांना सुन्न केले होते. या घटनेनंतर प्रकल्‍पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांवर येत असलेल्‍या तणावाला वाचा फुटली आहे. काल (ता.१९) सायंकाळी उशिरा विद्यार्थ्यांनी केलेल्‍या आंदोलनानंतर आयआयटी व्‍यवस्‍थापनाने परीक्षा पुढे ढकलल्‍या आहेत. (nashik IIT Delhi postponed exam marathi news)

यामुळे बुधवार (ता.२१) पासून सुरु होणाऱ्या परीक्षा २६ फेब्रुवारीपासून घेतल्‍या जातील. अत्‍यंत हुशार असलेल्‍या वरद नेरकर तेवीस वर्षीय युवकाने आत्‍महत्या केल्‍याच्‍या घटनेने आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हादरवून सोडले. पॉलिमर सायन्‍स ॲण्ड टेक्‍नॉलॉजी अभ्यासक्रमाच्‍या विद्यार्थ्यांनी आयआयटी व्‍यवस्‍थापनाला पत्र लिहितांना प्रयोगशाळा, इन्‍स्‍टिट्यूटच्‍या कार्यपद्धतीबाबत प्रश्‍न उपस्‍थित केले आहे.

एम.टेक.च्‍या विद्यार्थ्यांवर शैक्षणिक कामे व प्रयोग पूर्ण करण्याबाबत प्रचंड तणाव आहे. अशा परिस्थितीत वरदला इतक्‍या टोकाचा निर्णय घ्यावा लागल्‍याच्‍या परिस्‍थितीची निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. तसेच वरदसोबत शिक्षण घेत असलेल्‍या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी एकत्र येताना सायंकाळी उपोषण सुरु केले.

IIT Delhi
IIT Madras Sports Quota : मद्रास आयआयटी ठरलं स्पोर्ट्स कोटा आरक्षित करणारं पहिलं IIT

रात्री उशिरा व्‍यवस्‍थापनासोबत झालेल्‍या चर्चेनंतर सत्र परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्‍यानुसार आता २६ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार असल्‍याचे जाहीर केले आहे.

वरदच्‍या वडिलांचे ‘पीएमओं’ ना पत्र

मार्गदर्शकांकडून सहकार्य मिळत नसल्‍याची हरकत यापूर्वीच वरदच्‍या पालकांनी नोंदविली होती. यानंतर वरदचे वडील संजय नेरकर यांनी पंतप्रधान कार्यालयास पत्र नोंदवतांना विद्यार्थ्यांकडून मांडलेल्‍या मागण्या सादर केलेल्‍या आहेत. इतर कुठल्‍याही विद्यार्थ्याला अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलावे लागू नये, याकरिता विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सुटेपर्यंत पाठपुरावा करणार असल्‍याचे नेरकर यांनी सांगितले. ( latest marathi news )

IIT Delhi
IIT Delhi: मंदीतही संधी! आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चार कोटींच्या पॅकेजची ऑफर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com