
पिंपळगाव बसवंत : निवडणुक प्रचार आणि निकालाचा धुराळा निफाड तालुक्यात खाली बसल्यानंतर शेतकरी पुन्हा शेतीकामाकडे वळाले आहे. ऊसाचे आगार म्हणून ओळख असलेल्या गोदाकाठ परिसरात ऊस तोडीच्या लगबग जोरात सुरू आहे. नाशिकसह नगर जिल्ह्यातील कारखान्याचे कामगार तालुक्यात दाखले झाले असून कडाक्याच्या थंडीत पहाटपासून ऊसाच्या फडात कोयत्याचे वार केले जात आहे.