Nashik News : गुळगुळीत रस्त्यांमुळे शहरात अपघातात वाढ; सूचना फलक लावण्याची मागणी

Nashik : गतिरोधक टाकल्यानंतर त्यावर पांधरे पट्टे, रिफ्लेक्टर, नसल्याने परिणामी गतिरोधकावर आदळून अपघात होण्याच्या संख्येत वाढ होवू लागली आहे.
A traffic jam without white stripes on Kusumba Road here
A traffic jam without white stripes on Kusumba Road hereesakal

Nashik News : शहरात बहुतांशी रस्ते हे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहेत. यातील जुना-आग्रा महामार्ग व कुसुंबा रस्त्यावर वाहनांच्या गतीला मर्यादा बसावी म्हणून ठिकठिकाणी मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहे. मात्र गतिरोधक टाकल्यानंतर त्यावर पांधरे पट्टे, रिफ्लेक्टर, नसल्याने परिणामी गतिरोधकावर आदळून अपघात होण्याच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. (Nashik Increase in accidents in malegaon marathi news)

एकीकडे शहरातील रस्ते गुळगुळीत झाले असले तरी दुसरीकडे अपघात देखील वाढू लागल्याने काम पूर्ण झालेल्या रस्त्यांवर गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी नागरिक व वाहन चालकांकडून केली जात आहे.

शहरात गेल्या दोन वर्षात टेहरे चौफुली ते चर्च गेट, मौसम पूल ते गिरणा पुल, कुसुंबा रोड ते करीम नाका, जुना आग्रा महामार्गावरील सखावत हॉटेल ते ओवाढी नाला, सोमवार बाजार ते चर्च गेट, मसगा महाविद्यालय ते आरबीएच शाळेपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे. अनेक रस्त्यांची कामे होऊन वर्ष उलटले आहे. (latest Marathi News)

A traffic jam without white stripes on Kusumba Road here
Nashik News : महात्मानगरच्या प्रस्तावित जलकुंभाला विरोध! नागरिक एकवटले

रस्त्यावर महापालिका किंवा संबंधित ठेकेदाराने पांढरे पट्टे व दिशादर्शक फलक लावले नाहीत. त्यामुळे टेहरे चौफुली ते चर्च गेटपर्यंतचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर रबरी गतिरोधक टाकले असून ते सर्व खराब झाले आहेत.

जुना आग्रा रस्त्यावरील मोसम पूल ते गिरणा पुलापर्यंत मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. यातील काही गतिरोधकावर पांढरे पट्टे मारले नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. गतिरोधकावर दुचाकीसह इतर वाहने आदळून अपघात होत आहेत. कुसुंबा रस्त्यावरची परिस्थितीही अशीच आहे. रस्त्यावर दिवसभर प्रचंड दळणवळण असते. येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.

दिशादर्शक, पांढऱ्या पट्ट्यांचा प्रशासनाला विसर

येथील जुना- आग्रा रस्त्याचे फेज-३ पर्यंत काम झाले आहे आहे. नवीन बसस्थानक ते देवीचा मळा ओवाढी नाल्यापर्यत, मोसम पूल ते टेहरे चौफुली, मौसम पूल ते मोची कॉर्नर यासह अनेक रस्ते अजूनही पांढऱ्या पट्ट्यांपासून वंचित आहे. शहरात अनेक वाहनचालक मनमर्जीप्रमाणे वाहने चालवितात. बेशिस्त वाहतुकीमुळे येथे नवीन बसस्थानक, कुसुंबा रोड, जुना आग्रा रोड आदी ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे

A traffic jam without white stripes on Kusumba Road here
Nashik News : नासर्डी पुलावरील संरक्षक कठडा गायब! हजारो प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com