Nashik Salon Rates Hike : दाढी-कटींगच्या दरातही वाढ! या तारखेपासून होणार लागू

Nashik News : नवीन दरानुसार कटींग १०० रुपये, दाढी ६० रुपये तर दाढी-कटींग १५० रुपये ग्राहकाला द्यावे लागणार आहे.
Salon Rates Hike
Salon Rates Hikeesakal

नाशिक : महागाईचे चटके सार्यांच बसत असताना, आता दाढी-कटिंगच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. नवीन दरानुसार कटींग १०० रुपये, दाढी ६० रुपये तर दाढी-कटींग १५० रुपये ग्राहकाला द्यावे लागणार आहे. सदरचे वाढीव दर १ मे पासून लागू करण्यात आल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. (Nashik Increase in salon rates)

सलून दुकानदार चालक-मालक संघटनेच्या सिडको शाखेच्या बैठकीत दाढी-कटींगच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सलूनसाठी वापरण्यात येणारे साहित्य, कॉस्मेटिक, वीजदरात प्रचंड वाढ झालेली आहे. तसेच, गेल्या चार वर्षांपासून सलून व्यावसायिकांनी दरात वाढ केलेली नव्हती.

मात्र वाढती महागाईमुळे संघटनेने दाढी-कटींगसह विविध प्रकारच्या सलूनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक इशी, अध्यक्ष आबा महाले, उपाध्यक्ष पप्पू पगारे, कार्याध्यक्ष अजय निकम, खजिनदार उमेश सोनवणे, सह खजिनदार योगेश सैंदाणे, सचिव गोरखनाथ हिरे, सहसचिव भरत सोनवणे यांनी घेतला आहे. (Latest Marathi News)

Salon Rates Hike
Sam Pitroda Controversy: पित्रोदा बोलून गेले... मोदींनी गांधींनाच घेरलं... नेमकं काय घडलं?

असे आहेत नवीन दर

- कटींग : १२०

- स्टाईल कटींग : १५०

- दाढी : ६०

- फोम दाढी : ८०

- दाढी कोरणे : १००

- झिरो मशिन दाढी : ६०

- टक्कल करणे : १२०

- लहान मुलांची कटींग : १००

- फेसमसाज : १५०

- ब्लिचिंग : ५००

- फेशियल : ७००

- हेअर डाय : १२०

- हेअर स्पा : ५००

Salon Rates Hike
Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com