NMC News: गोदाघाटाच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र सफाई कर्मचारी! महापालिकेच्या मिळकतींसह, शाळांच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता

Nashik News : नाशिक महापालिकेचा पहिला आकृतिबंध ७०९२ पदांचा मंजूर करण्यात आला होता.
NMC Godaghat
NMC Godaghatesakal

नाशिक : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी पूर्व व पश्चिम विभागात आउटसोर्सिंगद्वारे सातशे सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता केली जात आहे.

त्यात आता नव्याने १७५ कर्मचारी संख्या वाढवून गोदावरी घाटासह गौरी पटांगण, अहिल्याबाई होळकर पूल ते कपिला संगम व पूर्व विभागातील महापालिकेच्या सर्व शाळांमधील शौचालय आदी ठिकाणी एकूण ८७५ कर्मचाऱ्यांद्वारे सफाई करण्यास महासभेने मान्यता दिली आहे. (Nashik Independent cleaning staff for Goda Ghat NMC marathi news)

नाशिक महापालिकेचा पहिला आकृतिबंध ७०९२ पदांचा मंजूर करण्यात आला होता. परंतु शहराचा विस्तार वाढत असताना शासनाने महापालिकेला ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात बढती दिली. महापालिकेचे प्रमोशन झाल्याने नवीन आकृतिबंध मंजुरीसाठी पाठविला आहे. दरम्यान पूर्वीच्या आकृतिबंधात २८०० सफाई कर्मचारी होते. परंतु, वाढत्या शहराच्या तुलनेत सफाई कर्मचारी अपुरे पडू लागल्याने पूर्व व पश्चिम विभागात यापूर्वी ७०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सफाई केली जात आहे.

आता नव्याने पुन्हा आउटसोर्सिंगच्या माध्यमातून १७५ सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती करून सफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. महासभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. महापालिकेचा शिक्षण विभाग व मिळकत विभागाने नियुक्त केलेल्या समितीने यासंदर्भात शिफारस केली होती. पुढील पाच वर्षांसाठी आउटसोर्सिंगद्वारे सफाई केली जाणार आहे.

वाढता खर्च तापदायक

महापालिकेने ‘एन-कॅप’अंतर्गत ३५ कोटी रुपये खर्च करून चार यांत्रिकी झाडू खरेदी केले आहेत. त्या माध्यमातून शहरात स्वच्छता केली जात असल्याचा दावा केला जात आहे. त्यापूर्वी सातशे कर्मचारी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सफाई करत आहे.

असे असताना पुन्हा नव्याने १७५ सफाई कर्मचारी नियुक्त केले जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. स्वच्छतेवरचा एकूण खर्च १७६ कोटींच्या घरात पोचल्याने महसुली खर्चात वाढ झाली आहे. खर्च वाढीच्या अनुषंगाने रिक्त पदांच्या भरतीवरील मर्यादा आणखी वाढल्या आहेत. (Latest Marathi News)

NMC Godaghat
Raj Thackeray on NCP: "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून येणाऱ्यांची मोळी"; राज ठाकरेंचा शरद पवारांवर घणाघात

या भागात होणार सफाई

पूर्व विभागातील गंगा व गोदावरी घाट, गौरी पटांगण, अहिल्याबाई होळकर पूल ते कपिला संगम, पूर्व विभागातील महापालिकेच्या सर्व शाळांमधील शौचालये, आस्थापना, विभागीय कार्यालये, महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, महापालिकेची सर्व नाट्यगृहे, सभागृहे, जलतरण तलाव, पश्चिम विभाग व पंचवटी लगतच्या घाटा लगतचा भाग या ठिकाणांची साफसफाई व स्वच्छतेचे कामकाज केले जाणार आहे.

सफाईसाठी असे लागणार मनुष्यबळ

- यापूर्वी नियुक्त करण्यात आलेले.- ७००

-कालिदास फुले कलादालन व नाट्यगृहे- ८२

- महापालिकेचे तरण तलाव- १२

- महापालिका शाळांचे स्वच्छतागृह- ८२

NMC Godaghat
NMC News : नाशिक मनपाला श्‍वान निर्बीजीकरणासाठी मोजावी लागणार अडीच पट रक्कम!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com