esakal | नाशिक-इंदूर हवाईसेवा होणार सुरू; ओझर विमानतळावरून विमानसेवा पूर्ववत
sakal

बोलून बातमी शोधा

nashik air service

नाशिक-इंदूर हवाईसेवा होणार सुरू; ओझर विमानतळावरून विमानसेवा

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असल्याने ओझर विमानतळावरून विमानसेवा पूर्ववत होत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता आता स्टार एअर कंपनीने १८ जुलैला एक दिवसासाठी प्रायोगिक तत्त्वावर नाशिक-इंदूर हवाई सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास निरंतर सेवा सुरू होणार आहे. (Nashik-Indore-Trial-Base-Air-Service-marathi-news-jpd93)

प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास निरंतर सेवा सुरू

जानेवारी व फेब्रुवारीत ओझर विमानतळावरून सुरू झालेल्या हवाई सेवेने अठरा हजार प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचवून विक्रम केला होता. परंतु मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारच्या नागरी हवाई मंत्रालयाने सर्व प्रकारच्या विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता टप्प्याटप्याने पुन्हा सेवा सुरू होत आहे. २ जुलैला स्टार एअरवेज कंपनीची बेळगाव-नाशिक सेवा सुरू झाली. दोन दिवसांपूर्वी ट्रू-जेट कंपनीची नाशिक-अहमदाबाद सेवा सुरू झाली. त्याच्या आदल्या दिवशी एअर अलायन्स कंपनीची नाशिक-अहमदाबाद-दिल्ली व नाशिक-पुणे-बेळगाव हवाई सेवा सुरू झाली. आता स्टार एअर कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर नाशिक-इंदूर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिकांच्या मागणीनुसार एक दिवसासाठी सेवा असेल. प्रतिसाद मिळाल्यास निरंतर सेवा सुरू केली जाणार आहे. रविवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी इंदूरहून विमानाचे उड्डाण होईल. ओझर विमानतळावर ते सायंकाळी साडेसहाला पोचेल.

ऑगस्टमध्ये कोलकता जोडणार

स्पाइस जेट कंपनीने नाशिक-कोलकता सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु लॉकडाउनमुळे त्याला मुहूर्त मिळाला नाही. आता ऑगस्टमध्ये कोलकता हवाई सेवेचे नियोजन आहे. नाशिक-दिल्ली-बेंगळुरू-हैदराबाद ही सेवादेखील जुलैअखेर सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: लग्नपत्रिकेवरून 'लव्ह जिहाद'चा आरोप; लग्न मोडण्याची वेळ

हेही वाचा: गाडीच्या बोनेटवर चढला मोठा साप; तरीही तब्बल 2 किमीचा प्रवास

loading image