Power Supply Cut Off : वीज पुरवठा खंडितमुळे उद्योगांना फटका! माळेगावला निमा पदाधिकारी आक्रमक

Nashik News : माळेगाव गेल्या काही दिवसांपासून औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या वीज पुरवठा खंडितमुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
Nima office bearers questioning power distribution officials at Nima House.
Nima office bearers questioning power distribution officials at Nima House.esakal

Nashik News : माळेगाव औद्योगिक वसाहतीत उद्योगांना सुरळीत वीजपुरवठा मिळणे अपेक्षित आहे. पण गेल्या काही दिवसांपासून औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या वीज पुरवठा खंडितमुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यास जबाबदार कोण, असा प्रश्न उद्योजकांनी उपस्थित केला आहे. (Industries hit by power cut NIMA officials are aggressive in Malegaon)

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना वीज पुरवठा खंडितमुळे मागील काही दिवसांपासून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. निमाच्या पदाधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत होण्याच्या मागणीसाठी निमा हाऊस सिन्नर येथे वीज वितरण अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी पदाधिकारी आक्रमक झालेले बघायला मिळाले.

व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे, सिन्नर विकास उपसमितीचे चेअरमन किरण वाजे, तक्रार उपसमितीचे चेअरमन सुधीर बडगुजर, ऊर्जा उपसमितीचे चेअरमन प्रवीण वाबळे व वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोड उपस्थित होते.

वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास निमाच्या पदाधिकाऱ्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशारा निमाचे उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी दिला. यावेळी सचिन कंकरेज, एस. के. नायर, विश्वजीत निकम, वि. वाय. वांद्रे, नितीन आव्हाड, मिलिंद इंगळे, किरण बुब, किरण लोणे, मंगेश मुजुमदार आदी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (latest marathi news)

Nima office bearers questioning power distribution officials at Nima House.
Nashik Teacher Constituency Result : विवेक कोल्हे, गुळवेंना आपसातील मतविभाजनाचा फटका

पेनल्टी चार्जेस परत करा; उद्योजकांची मागणी

उद्योग वसाहतीत अतिरिक्त ट्रान्सफॉर्मचा स्टॉक मेंटेन करणे, फिडरचे मेंटेनन्स, मीटर स्टॉक मेंटेन करणे, ट्री कटींग, उद्योगांसमोरील खराब झालेले डी. पी. बॉक्स नवीन टाकणे, गंजलेले चॅनेल्सचे मेंटेनन्स करणे, वीज बिल वेळेवर मिळत नसल्यामुळे उद्योगांना भरावे लागणारे पेनल्टी चार्जेस परत मिळण्याची मागणी उद्योजकांनी यावेळी केली.

भूखंड ताब्यात न घेतल्याने वीज उपकेंद्राचे रखडले काम वसाहतीत सुरळीत वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने नव्या वीज उपकेंद्रासाठी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीकडे पाठपुरावा करून सुमारे १४७५ चौ. मी. चा भूखंड मंजूर करून आणला. अद्याप हा भूखंड ताब्यात न घेता आल्यामुळे वीज उपकेंद्राचे काम रखडल्याने उद्योजकांनी संताप व्यक्त केला.

"पुढील ७ ते ८ दिवसांत औद्योगिक वसाहतीतील प्राथमिक मेंटेनन्सचे काम करून, उद्योजकांनी केलेल्या मागणीनुसार अतिरिक्त ट्रान्स्फार्मर, मेंटेनन्स मटेरियलसाठी मुख्य कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवणार आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आमचे कसोशीने प्रयत्न सुरु आहेत." - हेमंत बनसोड, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण

Nima office bearers questioning power distribution officials at Nima House.
Nashik News : धार्मिक क्षेत्रात राहुल गांधींच्‍या वक्‍तव्‍याचे पडसाद! प्रतिक्रियांतून संताप व्‍यक्‍त; दिले आध्यात्मिक दाखले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com