Maratha Reservation: मराठा आंदोलनातील हिंसेची चौकशी! आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली SIT

Nashik News : राज्यात मराठा आरक्षणादरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये हिंसात्मक आंदोलने झाली असता, त्यासंदर्भात राज्य सरकारने एसआयटी चौकशीची घोषणा केली होती.
Maratha Reservation
Maratha Reservationesakal

नाशिक : राज्यात मराठा आरक्षणादरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये हिंसात्मक आंदोलने झाली असता, त्यासंदर्भात राज्य सरकारने एसआयटी चौकशीची घोषणा केली होती. त्यानुसार ही चौकशी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली केली जाणार आहे. (nashik violence in Maratha andolan SIT headed by Commissioner marathi news)

Maratha Reservation
Manoj Jarange FIR news: जरांगेंवर पुण्यात गुन्हा दाखल, प्रकरण काय? | Maratha Reservation | Wagholi

राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलने झाली. या आंदोलनांदरम्यान काही ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. या हिंसक आंदोलनांमुळे राज्यातील सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचली. तसेच राजकीय वातावरण असि्‌थर करण्याचा प्रयत्न, सोशल मीडियाचा चुकीचा वापर, राज्यात दंगे भडकाविण्याचे प्रयत्न आदी मुद्दयांची चौकशी करण्यासाठी शासनाने एसआयटीमार्फत चौकशीचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची या एसआयटी चौकशीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कर्णिक यासंदर्भात चौकशी करून तीन महिन्यात अहवाल शासनाला सादर करणार आहेत. यामुळे या चौकशीकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation
Maratha Reservation : प्रमाणपत्र नसेल तर आरक्षणाचा उपयोग काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com