सातपूर: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय राज्य सरकारने निश्चित केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी उद्योजकांना जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यावर भर दिला जातो. त्यानुसार नाशिक जिल्ह्याला तीन हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य देण्यात आले होते.