वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करण्यात नाशिक आघाडीवर

nashik
nashikesakal

नाशिक : राज्याच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने सामाजिक एकतेच्या अनुषंगाने शहरे व गावांमध्ये पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या गल्ल्या, वस्त्या, गावे तसेच रस्त्यांची नावे बदलून जात हद्दपार करण्याच्या उपक्रमात नाशिक जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात ३२४ वाडे, वस्त्यांना जातिवाचक नावे होती ती नावे शंभर टक्के हद्दपार करून तेथे सामाजिक समरसतेशी एकरूप असे नामांतरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.

वस्त्यांच्या नावाला जात जोडण्याची ही प्रथा बंद

गावागावामधील वाड्या-वस्त्यांचा महारवाडा, बौद्ध वाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, चांभारवाडी असा उल्लेख केला जातो. वस्त्यांच्या नावाला जात जोडण्याची ही प्रथा बंद करावी आणि त्याऐवजी आता वस्त्या वाड्यांची नावे समतानगर, क्रांती नगर, भीमनगर, फुले नगर, शाहु नगर असे नामकरण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला.

त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेल्या ग्रामपंचायत स्तरावर जाती वाचक नावे असलेल्या गावे, वाडे, वस्त्यांची नावे मागविली होती. त्याचप्रमाणे नावे बदलण्याचे प्रस्ताव मागविले होते. जातिवाचक गावे, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून अशा जातिवाचक नावाऐवजी महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडित नावे देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीच्या बैठकीत विभागात नाशिक जिल्हा परिषदेने सर्वच्या सर्व म्हणजे ३२६ वाडे, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलल्याची माहिती देण्यात आली. विभागात नाशिक जिल्हा जातिवाचक नावे हटविण्यात आघाडीवर असल्याची माहिती यावेळी सादर करण्यात आलेल्या अहवालातून स्पष्ट झाली.

विभागात पहिला क्रमांक

नाशिक जिल्ह्यात ३२४ वाडे, वस्त्या, रस्त्यांना जातिवाचक नावे होती त्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ३२४ जातिवाचक नावे हद्दपार करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात ५१० पैकी एकही जातिवाचक नावे बदलले गेले नाही. नंदूरबार जिल्ह्यात १०२ पैकी ९७, जळगाव जिल्ह्यात २८ पैकी २८, अहमदनगर जिल्ह्यात १५१ पैकी ६८ गावांमध्ये जातिवाचक नावे बदलण्यात आली आहेत.

महापालिका आघाडीवर

महापालिका स्तरावर नाशिक महापालिका हद्दीत ८१ वाडे, वस्त्यांची नावे हद्दपार करण्यात आल्याने महापालिकेत देखील शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. धुळे महापालिका हद्दीत २९ पैकी एकही नाव बदलले नाही. जळगाव महापालिका हद्दीत ५९ पैकी एकही नाव बदलले नाही. अहमदनगर महापालिका हद्दीत जातिवाचक नाव असलेली एकही गल्ली, रस्ते नसल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

nashik
महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून जातिवाचक नावांची माहिती मागवली होती त्यानुसार ३२४ गावे,वाडे, वस्त्यांना जाती वाचक नावे असल्याचे समोर आले होते आता जातींची नावे शंभर टक्के हद्दपार झाली असून नाशिक विभागात आघाडीवर आहे.

- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

nashik
गोदावरी घाटावर तिप्पट सुरक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com