JEE Mains Exam 2024 : जेईई मेन्‍स परीक्षा उद्यापासून; नाशिकमधील परीक्षा केंद्रांवर विविध सत्रांत आयोजन

JEE Mains Exam : नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे जॉइंट एंट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स २०२४ परीक्षेच्‍या द्वितीय सत्राला गुरुवार (ता.४) पासून सुरवात होत आहे.
JEE Mains Exam
JEE Mains Examesakal

JEE Mains Exam 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे जॉइंट एंट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स २०२४ परीक्षेच्‍या द्वितीय सत्राला गुरुवार (ता.४) पासून सुरवात होत आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेल्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिलेले आहे. राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्‍स परीक्षेचा पेपर क्रमांक एक हा ४ ते ९ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. ()

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या लॉगइन आयडीच्‍या साहाय्याने प्रवेशपत्र प्राप्त करून घेता येणार आहेत. या प्रवेशपत्रावर संबंधित विद्यार्थ्यांच्‍या परीक्षेची तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता असा सर्व तपशील उपलब्‍ध होणार आहे. सकाळ सत्रात सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत आणि दुपारच्‍या सत्रात दुपारी तीन ते सायंकाळी सहा यादरम्‍यान संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा होणार आहे. (latest marathi news)

JEE Mains Exam
JEE Main Exam : दुसऱ्या सत्रातील ‘जेईई मेन २०२३’ परीक्षा येत्या गुरुवारपासून

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जात असून, विद्यार्थ्यांना परीक्षेच्‍या दोन संधी उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. यापैकी जानेवारी महिन्‍यात पहिल्‍या सत्रातील परीक्षा पार पडली होती. व आता एप्रिलमध्ये दुसऱ्या सत्रातील परीक्षा होत आहे. या दोन्‍ही परीक्षांमधील सर्वोत्‍कृष्ट कामगिरी ग्राह्य धरुन राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादी तयार केली जाणार असून, त्‍याआधारे राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाईल.

या क्रमवारीनुसार विद्यार्थी जेईई ॲडवास्‍ड परीक्षेसाठी पात्रता मिळवतील. दरम्‍यान आता दुसऱ्या सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्‍यानंतर निकालाची प्रक्रिया पुढील काही दिवसांत राबविली जाईल. त्‍यामुळे विद्यार्थी व पालकांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागून राहणार आहे. दरम्‍यान आर्किटेक्‍ट आणि प्‍लॅनिंग या शिक्षणक्रमातील प्रवेशासाठीचा पेपर दोन १२ एप्रिलला पार पडणार आहे.

JEE Mains Exam
JEE Mains Exam : जेईई मेन परीक्षा ४ एप्रिलपासून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com