National Peoples Court: लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना : न्यायाधीश अमित कोष्टी

Nashik News : बागलाण तालुका विधी सेवा समिती व सटाणा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आयोजित लोकन्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
Judge Amit Koshti, Associate Civil Judge Priyanka Ahire, President of Satana Vakil Sangh Adv.
Judge Amit Koshti, Associate Civil Judge Priyanka Ahire, President of Satana Vakil Sangh Adv.esakal

सटाणा : पक्षकारांना वेळ व पैशांची बचत करण्यासाठी लोकन्यायालय अत्यंत उपयुक्त असून, न्यायालयीन प्रकरणांत दोन्ही बाजूंना न्याय मिळतो. न्यायालयावरील खटल्यांचा भार कमी होवून गोरगरीबांना लवकर न्याय मिळू शकतो.

काही प्रकरणांत तरी सर्वसामान्यांना तत्काळ आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी लोकन्यायालय आदर्श संकल्पना आहे, असे प्रतिपादन बागलाण तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व सटाणा न्यायालयाचे न्यायाधीश अमित कोष्टी यांनी केले. (nashik National People Court satana marathi news)

बागलाण तालुका विधी सेवा समिती व सटाणा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आयोजित लोकन्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश प्रियंका अहिरे, सटाणा वकील संघाचे अध्यक्ष पी.एम.भदाणे, विस्तार अधिकारी नितीन देशमुख उपस्थित होते.

अॅड.पंडितराव भदाणे म्हणाले, पाश्‍चिमात्य देशात जलद गतीने न्याय मिळतो. मात्र, आपल्याकडे न्यायप्रक्रियेस विलंब होतो. समाजाच्या कर्तव्याचीही जाणीव प्रत्येकाने ठेवावी. (Latest Marathi News)

Judge Amit Koshti, Associate Civil Judge Priyanka Ahire, President of Satana Vakil Sangh Adv.
National Peoples Court : येवल्यात लोकअदालतीत 905 प्रकरणांमध्ये 1 कोटी 26 लाख शुल्क वसूल!

- एकूण प्रलंबित खटले : ८३०

- दाखलपूर्व प्रकरणे : ८९५९

- दोन्ही पॅनलमिळून निकाली खटले : १९७९

- निकाली प्रकरणांतून एकूण वसुली : १ कोटी ३५ लाख ५३ हजार ७२८

Judge Amit Koshti, Associate Civil Judge Priyanka Ahire, President of Satana Vakil Sangh Adv.
Maha Shivratri 2024: नांदूरमध्यमेश्वरला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा! रथासह मुखवट्याची मिरवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com