Nashik Ashram School Minor Girl Delivery
esakal
नाशिकमध्ये आश्रम शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील मोहनदरी आदिवासी निवासी आश्रम शाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.