नव्या वर्षात नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार...

local train
local trainesakal

नाशिक रोड : नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी प्रस्तावित नाशिक- कल्याण लोकलसाठी (Local train) दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. मात्र, नाशिक कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टीपरपझ युनिट - MEMU) लोकल अजूनही सुरू झालेली नाही. नवीन वर्षात ही लोकल टेस्टिंग (Testing) करून सुरू होण्याची आशा नाशिकहून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह नाशिककरांना आहे.

नाशिककर आशेवर

बहुप्रतिक्षित असणाऱ्या नाशिक- कल्याण लोकलला लाल कंदील दाखविण्यात आला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली नाशिक कल्याण लोकल मागे पडली. निवडणुका झाल्यावर नवीन वंदे मातरम (Vande Mataram train) मेमू लोकलचा घाट घातला गेला. लोकल ही संकल्पना रद्द करून मेमू लोकल चालविणार असल्याची अंतिम घोषणा रेल्वेने केली आहे. आता या मेमू लोकलची चाचणी लवकरात लवकर करून ती रूळावर आणावी, अशी मागणी नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.

local train
संजय राऊतांची राणेंचे नाव न घेता खरमरीत टीका, म्हणाले गुन्हेगारांना..

नाशिक- कल्याण लोकलचा गाजावाजा झाला. लोकल सुरू होणार, म्हणून नाशिकहून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आनंदोत्सवही केला. खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसभेत मागणी केल्यामुळे नाशिक- कल्याण लोकल मंजूर झाली. नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी राज्यराणी, पंचवटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्या आहेत. यात नाशिक- कल्याण मेमू लोकलची अधिक भर पडणार आहे. नाशिककर या गाडीची चातकासारखी वाट पाहत असून, रेल्वेमंत्र्यांनी लक्ष घालावे, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना प्रशासनाला साकडे घालणार आहे.

''नाशिक- कल्याण मेमू लोकल सुरू झाल्यावर नाशिकच्या अर्थकारणाला गती मिळेल. व्यवसाय, रोजगार, दळणवळणासह शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी हायटेक बाजारपेठ मिळणार आहे. रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक नवीन पर्याय उपलब्ध होईल. ही लोकल नव्या वर्षात सुरू करावी.'' - सिद्धेश सानप, प्रवासी

''नाशिक- कल्याण आणि नाशिक- पुणे या मार्गावर मेमू लोकल सुरू केल्यास शहरांच्या कनेक्टिव्हिटीला चालना मिळू शकते. शिवाय विद्यार्थी, नोकरदार, व्यवसायिकांना प्रवास करणे सोयीचे होईल. त्यामुळे नव्या वर्षात रेल्वेने शहरीकरणाचा विचार करता अनेक दिवसांपासून प्रस्तावित असणारी नाशिक- कल्याण मेमू सुरू करायला पाहिजे.'' - वामन सांगळे, रेल्वे इंजिन तज्ज्ञ

local train
जगात सर्वाधिक विकले जाणारे 10 व्हिस्की ब्रॅंड; पैकी 7 आहेत भारतीय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com