Nashik News : करंजकर दाम्पत्याकडे 28 कोटींची संपत्ती; पावणे तीन लाखांचे सोने

Nashik : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर उमदेवार विजय करंजकर यांच्या कुटुंबाची संपत्ती २८ कोटी ७२ लाखांवर आहे.
Vijay Karanjkar
Vijay Karanjkaresakal

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर उमदेवार विजय करंजकर यांच्या कुटुंबाची संपत्ती २८ कोटी ७२ लाखांवर आहे. यात पावणेतीन लाखांचे सोने तर १२ लाख रुपयांची रोख रक्कम असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. एवढी संपत्ती नावे असताना करंजकरांनी स्वत:च्या पत्नीकडून दोन लाख रुपये व राजेंद्र करंजकर यांच्याकडून पाच लाख रुपये उसने घेतल्यामुळे त्यांच्यावर १६ लाखांचे कर्ज झाले आहे. (Karanjkar couple has wealth of 28 crore )

विजय करंजकर यांनी शुक्रवारी (ता.३) अपक्ष अर्ज दाखल करताना त्यासोबत प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरण सादर केले आहे. त्यांच्या नावे २ कोटी ५२ लाख ९१ हजारांची जंगम मालमत्ता आहे. पत्नी अनिता करंजकर यांच्याकडे एक कोटी ३९ लाखांची संपत्ती आहे. करंजकरांकडे २४३० ग्रॅम सोने असून त्याचे मुल्य एक कोटी ७० लाख १० हजार रुपये इतके आहे.

पत्नी अनिता यांच्याकडे १५०० ग्रॅम सोने आहे. त्याचे मुल्य एक कोटी ५ लाख रुपये आहे. करंजकर दाम्पत्याकडे २४ कोटी ७९ लाख ७३ हजार रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये वडिलोपार्जित व स्व-संपादित केलेल्या मालमत्तेचा समावेश आहे. या व्यतितिरिक्त तीन चारचाकी वाहने, एक ट्रॅक्टर व एक दुचाकी त्यांच्या नावे आहे. करंजकरांच्या नावावर सात गुन्हे दाखल आहेत. (latest marathi news)

Vijay Karanjkar
Nashik News : खेळण्यासाठी गेलेली 2 बालके पाण्यात बुडाली; सिन्नरच्या रामनगर मध्ये सख्या बहिण-भावाचा मृत्यू

नाशिकमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्याकडे एक लाख रुपयांची रोख रक्कम असून, २४ लाख ३५ हजारांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ३२ लाख १० हजारांची स्थावर मालमत्ता दिसत असली तरी जवळपास २१ लाखांची वडिलोपर्जित संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

कुटूंबाच्या नावेदेखील अन्य मालमत्ता आहेत. दिंडोरीतील वंचितच्या उमेदवार मालती थविल यांच्याकडे ३ लाख १२ हजार ६०० रूपयांची चल तर एक लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या नावे १ लाख ५२ हजार रुपयांचे मुद्रा व वाहन कर्ज आहे.

Vijay Karanjkar
Nashik News : शेतकरीच नवरा हवा गं बाई..! मुंबईतील उच्च शिक्षित तरुणीचा हट्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com