Nashik Kesari : सातपुरला आज ‘नाशिक केसरी’ स्पर्धा; विविध जिल्ह्यातील नामवंत पहिलवान नाशिकला दाखल

Nashik News : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत मंगळवारी सायंकाळी चारला अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर ‘नाशिक केसरी’ जिल्हास्तरीय कुस्ती दंगल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
wrestling competition (file photo)
wrestling competition (file photo)esakal

सातपूर : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत मंगळवारी (ता.१४) सायंकाळी चारला अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर ‘नाशिक केसरी’ जिल्हास्तरीय कुस्ती दंगल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Kesari wrestling competition in Satpur today)

सालाबादाप्रमाणे यंदाही पहिलवान हेमंत घुगे व वैभव नागरे यांनी या कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन केले आहे. नाशिक केसरी स्पर्धेसाठी कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, धुळे या जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर,चांदवड, नाशिक, मालेगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यासह भगूर.

साकुर, पिंपळगाव बहुला या ठिकाणचे नामांकित तालीम संघातील पहिलवान नाशिकमध्ये दाखल झाले आहे. पुणे येथील डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान शिवराज राक्षे व उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान योगेश पवार यांच्यात प्रमुख कुस्ती होणार असून ही जोडी कुस्त्यांचे आकर्षण ठरणार आहे. (latest marathi news)

wrestling competition (file photo)
Comrade Marathon : आफ्रिकेतील मॅरेथॉनसाठी धावपटूंची रंगीत तालीम; सप्तशृंगगड-कळवण मार्गावर सराव

महाराष्ट्र चॅम्पियन नाशिक बाळू बोडके व डबल महाराष्ट्र चॅम्पियन गंगावेस तालीम कोल्हापूरचे सागर चौगुले यांच्यात द्वितीय कुस्ती होणार आहे. प्रथम पारितोषिक दोन लाख ११ हजार तर द्वितीय पारितोषिक १ लाख अकरा हजार रुपये असणार आहे.

दरम्यान, जिल्हाभरातील विविध तालीम संघातील पहिलवान यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या विराट कुस्त्यांच्या दंगली सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक पहिलवान हेमंत घुगे व वैभव नागरे यांनी केले आहे.

wrestling competition (file photo)
Nashik News : ड्रग्जप्रकरणातही वैभवची झाली होती चौकशी; कुस्तीपटू लहामगे खून प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com