Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी शहरात 35 ई-सेवा केंद्र! तहसील कार्यालयातर्फे परवानगी

Nashik News : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांची धावपळ होत आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal

Nashik News : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांची धावपळ होत आहे. महिलांना या योजनेचा लाभ घेता याव, कागदपत्र जमा करताना त्यांची धावपळ होवू नये म्हणून योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ई-सेवा केंद्रांना तहसील कार्यालयामार्फत परवानगी दिली जात आहे. (Ladki Bahin Yojana 35 e-seva centers in city Permission from Tehsil Office)

नाशिक शहरात आतापर्यंत ३५ केंद्रांना परवानगी देण्यात आली असून, अजूनही ई सेवा केंद्राचे प्रस्ताव प्राप्त होत असल्याने शहरातील केंद्रांची संख्या वाढणार आहे. नाशिक शहरासह नाशिक तालुक्यातील महिलांना लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी ई-सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहेत.

तसेच रेशनकार्डमधील नाव कमी करणे किंवा समाविष्ट करण्यासाठी नाशिक तहसील कार्यालयाने एक खिडकी योजना सुरु केली आहे. योजनेचा लाभ घेताना कागदपत्रांचा कुठलाही अडसर येवू नये, यासाठी शहरात विभागनिहाय ई-सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत अर्ज भरले जात असल्यामुळे तहसील कार्यालयावरील कामाचा ताण हलका झाला आहे.

ई-सेवा केंद्र चालकांना अर्ज भरण्याचे दर पत्रक प्रसिद्ध करण्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय दाखले व रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, रेशन कार्ड काढणे यांसारखी कामे करण्यासाठी गर्दी वाढली आहे. डोमिसाइल, उत्पन्नाचा दाखला व रेशन कार्ड काढण्यासाठी ५०० ते १००० रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी होत्या. (latest marathi news)

Ladki Bahin Yojana
Nashik Dengue Update : जिल्ह्यात आतापर्यंत 79 रुग्णांना डेंगीची लागण! जूनमध्ये 28 डेंगींचे रुग्ण

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शर्मा यांनी बैठकीचे आयोजन करीत संबंधित यंत्रणेला कारवाईचे आदेश दिले. शहरातील नागरिकांसाठी प्रत्येक विभागात ई-सेवा केंद्रांना परवानगी दिली जात आहे. यासाठी लूट सुरू असल्याचे आढळल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे यंत्रणा सर्तक झाली आहे.

दलालांना नो एन्ट्री

तहसील कार्यालयात आल्यानंतर सहजपणे काम व्हावे यासाठी एक खिडकी योजना सुरु झाली आहे. शुक्रवारी (ता.५) ज्या व्यक्तीचे काम आहे, अशाच व्यक्तींना तहसीलच्या आवारात प्रवेश देण्यात आला. काम नसलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे दलालांना प्रवेशच मिळाला नाही. नाशिक तहसील कार्यालयाकडे लाडकी बहीण योजनेंतर्गत शुक्रवारी केवळ एका महिलेचा अर्ज प्राप्त झाला.

Ladki Bahin Yojana
Nashik Water Shortage : 935 गावे-वाड्यांना 228 टॅंकरद्वारे पाणी; पावसाअभावी टॅंकरला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com