Saptashrungi Devi Chaitrotsava : सियावर रामचंद्र की जयच्या घोषाने सप्तशृंगी गड दुमदुमला

Saptashrungi Devi : श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर अतिशय मंगलमय व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
Chief District and Additional Sessions Judge Srichand D. present during Panchamrit Mahapuja at Adimaye temple. Chairman of Jagmalani and Niwasini Devi Trust and District and Additional Sessions Judge Balasaheb V. Tiger and family.
Chief District and Additional Sessions Judge Srichand D. present during Panchamrit Mahapuja at Adimaye temple. Chairman of Jagmalani and Niwasini Devi Trust and District and Additional Sessions Judge Balasaheb V. Tiger and family.esakal

Saptashrungi Devi Chaitrotsava : ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके’, ‘शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते’ ची मंत्रधुन व ‘सियावर प्रभू रामचंद्र की जय’ चा जयघोषाने आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर अतिशय मंगलमय व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी व आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवासाठी मंगळवारी (ता. १६) रामनवमीच्या पूर्वसंध्येलाच भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. (nashik large numbers Devotees for Chaitrotsav of Saptashrungi Mata )

तर प्रशासकीय यंत्रणा बुधवार (ता.१७) सकाळपासून कार्यरत झाली. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामाची जबाबदारी, ठिकाण निश्चित करून व्यवस्थेचा आढावा घेतला. राज्य परिवहन महामंडळाने नांदुरी येथे गडाच्या पायथ्याशी व गडावरील जलशुद्धीकरण केंद्राजवळ तात्पुरते बसस्थानक उभारले होते. दुपारनंतर गडावर खासगी वाहनांना रस्ता बंद झाला.

सकाळी साडेसात वाजता देवीच्या आभूषणे, महावस्त्र, पूजा विधीचे साहित्याची न्यासाच्या कार्यालयापासून सवाद्य मिरवणुक काढली. चैत्रोत्सव व रामनवमीनिमित्त देवी मंदिर गाभाऱ्यात विविध फुले व हिरव्यागार पानांची आकर्षक तोरण व झुंबर तयार करून सजावट केली होती. प्रमुख जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीचंद डी. जगमलानी यांनी सकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान देवीची पंचामृत महापूजा व महाआरती केली.

यावेळी दरम्यान श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बाळासाहेब व्ही. वाघ, विश्वस्त ॲड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, भूषणराज तळेकर, डॉ. प्रशांत देवरे तसेच मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सहा.व्यवस्थापक भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्तोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, संदीप बेनके, मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार, प्रशांत निकम आदींसह पुरोहित वर्ग उपस्थित होते. (latest marathi news)

Chief District and Additional Sessions Judge Srichand D. present during Panchamrit Mahapuja at Adimaye temple. Chairman of Jagmalani and Niwasini Devi Trust and District and Additional Sessions Judge Balasaheb V. Tiger and family.
Saptashrungi Devi Temple : आदिमाया सप्तशृंगी मंदिरात 8 किलोची चांदीची कृष्णमूर्ती अर्पण

मंदिर पायऱ्यांवरील श्रीराम टप्पा येथील श्रीराम मंदिरातही विविध फुलांची आकर्षक सजावट केली होती. सकाळी मंदिराचे पुजारी सुनील दिक्षीत यांना विधीवत श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक, पंचामृत महापूजा केली. दुपारी बारा वाजता मंदिरात श्रीरामांच्या जयघोषात जन्मोत्सव साजरा झाला. विश्वस्त तळेकर यांच्या हस्ते वेगवेगळे फळे, खिरापत व पंजिरीचा नैवद्य दाखवून श्रीरामांची महाआरती करण्यात आली.

चैत्रोत्सव कालावधीत आलेल्या भाविकांसाठी विश्वस्त संस्थेमार्फत अन्नपूर्णा प्रसादालयात मोफत महाप्रसादाची सुविधा उपलब्ध केली असून, भगवती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी २४ तास खुले केले आहे. विश्वस्त संस्थेच्या परिसरात ३ ठिकाणी भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय व चुकामूक होऊ नये या दृष्टीने कक्ष कार्यान्वित केले आहेत. तसेच एकूण २५६ सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांची भाविकांवर नजर ठेवून आहेत.

महाराष्ट्र सुरक्षा बल, सुरक्षा रक्षकांसह, महाराष्ट्र राज्य पोलिस, राज्य गृहरक्षक दलाचे कर्मचारी व अधिकारी वर्गही लक्ष ठेवून आहेत. ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथमोपचार केंद्र कार्यान्वित केले आहेत. तसेच विविध ठिकाणी माता-भगिनींसाठी हिरकणी कक्ष कार्यान्वित केले आहेत. गर्दीच्या नियोजनासाठी सुरक्षारक्षक, राज्य सुरक्षा बल, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात आहेत.

Chief District and Additional Sessions Judge Srichand D. present during Panchamrit Mahapuja at Adimaye temple. Chairman of Jagmalani and Niwasini Devi Trust and District and Additional Sessions Judge Balasaheb V. Tiger and family.
Saptashrungi Devi Chaitrotsava : सप्तशृंगीदेवीचा उद्यापासून चैत्रोत्सव; भाविकांसाठी ठिकठिकाणी सुविधा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com