Self Confidence : आपल्यातील ऊर्जा अन् आत्मविश्वास ओळखा!

Self Confidence : खासगी अथवा सार्वजनिक आयुष्य जगत असताना आपण अनेक आयुष्यातल्या लढाया, संघर्षाला नेहमीच सामोरे जात असतो.
Author: Adv. Nitin Thackeray
Author: Adv. Nitin Thackerayesakal

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

खासगी अथवा सार्वजनिक आयुष्य जगत असताना आपण अनेक आयुष्यातल्या लढाया, संघर्षाला नेहमीच सामोरे जात असतो. येणाऱ्या आव्हानांना कसे तोंड द्यायचे, याबाबत आपण नेहमी चिंतेतही असतो. यासाठी ऊर्जा स्वरूपात आपल्याला काहीतरी मिळाले पाहिजे, जेणेकरून आपण आयुष्यात आलेल्या संकटाचा सामना करू शकतो. ज्याचा शोध आपण अविरतपणे घेतच असतो. मात्र, यशाची संजीवनी ही आपल्यातच आहे, ती फक्त वेळेत ओळखली पाहिजे. ती म्हणजे, आपल्यात असलेली प्रचंड ऊर्जा व आत्मविश्वास!

(nashik latest article Know your energy and confidence marathi news)

आजचे व्यावसायिक जग हे चढाओढीचे आहे. व्यावसायिकदृष्ट्या प्रत्येक जण स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. या प्रयत्नांना यश तेव्हाच येते, जेव्हा अविरत कष्टांना जोड असते दृढ आत्मविश्वासाची. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण उत्कृष्टरीत्या पार पाडू शकू, याची खात्री आपल्या आसपासच्या लोकांवर पडणारी आपल्या व्यक्तिमत्त्वाची प्रभावी छाप, आपल्या वागण्या-बोलण्यातली सहजता, ही दृढ आत्मविश्वास असलेल्या व्यक्तींची स्वभाववैशिष्ट्ये म्हणता येतील.

पण, सर्वच व्यक्तींना आत्मविश्वासाने वावरता येतेच, असे नाही. किंबहुना, कष्ट करण्याची तयारी, दिलेली जबाबदारी किंवा कामे पार पाडण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे असूनही केवळ आत्मविश्वासाअभावी मागे राहिलेली माणसे आपण वेळोवेळी पाहत असतो. आपल्याला जबाबदारी पेलता येईल किंवा नाही, यश न मिळाल्यास काय होईल, आपली मते इतरांना पटवून देता येतील किंवा नाही, या आणि अशा अनेक प्रश्नांची काळजी सतत त्यांच्या मनात असते; पण याच दृष्टिकोनात थोडा जाणीवपूर्वक बदल केला तर आपला आत्मविश्वास खचितच वाढेल आणि व्यावसायिकदृष्ट्या आपण आपले स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण करू शकू.  (latest marathi news)

Author: Adv. Nitin Thackeray
Nitin Gadkari : काँग्रेसचे इच्छुक करणार पाच वर्षे प्रतीक्षा; गडकरी यांच्या नावामुळे उत्साह मावळला

आजचे काम उद्यावर सोपवू नये

आपल्याला सोपविलेल्या कामाच्या बाबतीत चालढकल करणे टाळावे. ‘नंतर बघू’ किंवा ‘वेळ आली की करू’ असा विचार करून कित्येकदा कामे पुढे ढकलली जातात. यासाठी अनेक कारणे असू शकतात. कधी कामासंबंधी निर्णय घेता येत नाही म्हणून किंवा टीममधल्या सहकाऱ्यांशी एकमत नाही म्हणून किंवा इतरही अनेक प्रश्न असतात, त्यावर वेळीच उपाययोजना करून असे प्रश्न वेळ न घालविता सोडवायला हवेत.

अडथळ्यांतून मार्ग काढावा

आपल्या ध्येयाकडे आपण करीत असलेल्या वाटचालीत कधी लहान-मोठ्या अडचणी येत असतात. अशा प्रसंगी धैर्य न गमावता अडचणींना सामोरे जावे. कधी-कधी मनावरचा ताण इतका जास्त असतो, की आपण आपल्या ध्येयाची पाठ सोडायलाही तयार होतो; पण तसे न करता, विचारपूर्वक मार्ग निवडावेत. गरज लागल्यास आपल्या सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. नुसत्या तक्रारी करीत बसण्यापेक्षा आलेल्या अडथळ्यांतून कसा मार्ग काढता येईल, याचा विचार करावा.

‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडा

बदल, मग तो कुठल्याही प्रकारचा असो, सहसा लवकर स्वीकारला जात नाही. आपली काम करण्याची पद्धत, विचारपद्धती आपण सहसा बदलायला तयार नसतो. कधी-कधी त्यामुळेही आपले काम पार पाडण्यात आपल्याला अडचणी येतात. अशा वेळी आपल्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडून काम करण्याची नवीन पद्धत अंगीकारून आपल्याला करावयाचे असलेले काम अधिक नावीन्यपूर्ण पद्धतीने कसे करता येईल, याचा विचार जरूर करावा.

Author: Adv. Nitin Thackeray
Adv. Prashant Bhushan : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी घेणे म्हणजे भाजपचा हप्ता वसुलीचा धंदा - ऍड. प्रशांत भूषण यांचा आरोप

स्वतः सकारात्मक राहा, इतरांकडे दुर्लक्ष करा

आपल्या निर्णयांनी किंवा मतांनी सर्वांचीच मने जिंकून घेणे नेहमीच शक्य होत नसते. अशा परिस्थितीत आपण आपल्या ध्येयापासून विचलित न होता काम करावे. सर्वांना सतत खूश ठेवता येतेच, असे नाही आणि तशा प्रयत्नात आपली ओढाताण होत नाही ना हे पाहावे. त्याचबरोबर आपल्या आसपासच्या व्यक्तींमध्ये आपण घेतलेल्या निर्णयांबद्दल, आपल्या मतांबद्दल, आपल्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल सतत नकारात्मक मते प्रदर्शित करणारी मंडळी असतात. अशा व्यक्तींची मते फारशी मनावर न घेता आपण स्वतःचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे.

इतरांशी तुलना टाळा

आपल्याला मिळत असलेल्या यशापयशाची किंवा आपल्या कुवतीची तुलना इतरांशी करणे टाळावे. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, विचारप्रक्रिया, निर्णय घेण्याची क्षमता वेगळी असते. आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करून आपली जबाबदारी, काम सांभाळायला हवे. संपूर्ण विचार करून आखलेल्या आपल्या कामाच्या आराखड्यावर विश्वास ठेवून केलेल्या नियोजनानुसार एकेक पायरी चढत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी.

निःसंकोचपणे मार्गदर्शन घ्या

कित्येकदा आपण अथक प्रयत्न करूनही म्हणावे तसे परिणाम आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे आपला आत्मविश्वास खचून जातो. अशा वेळी काम करण्याच्या नवनवीन पद्धती अवलंबणे, त्याचबरोबर वेळप्रसंगी वरिष्ठांचा किंवा सहकाऱ्यांचा सल्ला घेणे हिताचे ठरते. आपल्याबरोबर असणारे छोटे व मोठे सर्वांकडूनच आपणास काही ना काही शिकायला मिळत असते. त्यामुळे मार्गदर्शन घेताना आपण लाजू नये.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहेत.)

Author: Adv. Nitin Thackeray
Adv Nitin Thakare : मविप्रच्या शाखेला देणार कर्मयोगी जाधव यांचे नाव | ॲड. नितीन ठाकरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com