नाशिक: रक्षाबंधनाच्या दिवशीच एका बहिणीला आपल्या लाडक्या भावाला अश्रूंनी निरोप द्यावा लागला. बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या आयुष किरण भगत (वय ४, रा. वडनेर दुमाला) या चिमुकल्याचा अंत्यसंस्कार हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वालदेवी नदीतीरावर दुपारी बाराला करण्यात आला.