नाशिक: वडनेर दुमाला येथील भगत वस्तीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांच्या आयुष किरण भगत या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे वन विभागाने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. देवळाली गाव, वडनेर, पिंपळगाव आणि बहुला या भागांमध्ये पाच पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.