
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील बिजोटे येथील गायधरा शिवारात बिबट्या विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात येतात ग्रामस्थांनी तातडीने बाज (खाट) विहिरीत सोडत बिबट्याचे प्राण वाचवले. सटाणा वनविभागाचे कर्मचारी दाखल होत अखेरीस बिबट्याला मोठ्या शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद केले.