Nashik News : रोहिले पाणीयोजनेसाठी थेट राज्यपालांकडे कैफियत

Nashik News : सरपंचांनी मंजूर झालेल्या पाटबंधारे खात्याच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करावे, यासाठी आता थेट राज्यपालांना पत्र पाठवत कैफियत मांडली आहे.
Water Supply
Water Supply esakal

Nashik News : रोहिले (ता. त्र्यंबकेश्वर) येथे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, सरपंचांनी मंजूर झालेल्या पाटबंधारे खात्याच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करावे, यासाठी आता थेट राज्यपालांना पत्र पाठवत कैफियत मांडली आहे. गेल्या ४२ वर्षांपासून येथील गावकरी रोहिले धरण झाले पाहिजे, यासाठी लढा देत आहे.

हा लढा यशस्वी झाला, योजना मंजूर झाली; मात्र त्याची मुहूर्तमेढ अजूनही रोवली जात नाही. स्व. गोपाळराव नामदेव तिदमे यांनी ४२ वर्षांपासून या धरणासाठी लढा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अथक प्रयत्न करून त्र्यंबकमधील रोहिले धरण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली.

मात्र अजूनही त्याचे काम सुरू झालेले नाही. आचारसंहितेमुळे रोहिले गावकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. (latest marathi news)

Water Supply
Nashik Vegetables Rate Hike : पालेभाज्या, फळभाज्यांना आला ‘भाव’! उन्हामुळे आवक घटत चालल्याचा परिणाम

त्यामुळे सरपंच रतन खोडे आणि उपसरपंच सचिन तिदमे यांनी थेट राज्यपालांना पत्र लिहीत या योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

"योजना मंजूर होऊन दोन वर्षे होऊनही अद्याप काम सुरू होत नाही. प्रशासनातील बाबू मंडळीच्या जंजाळात योजना रखडली आहे. माझ्यासह ग्रामस्थांवर काम सुरू होण्यासाठी बेमुदत उपोषण करण्याची वेळ आली आहे. असेच जर होणार असेल तर मतदानावरही बहिष्कार टाकावा लागेल."- सावळीराम तिदमे, रोहिले

Water Supply
Nashik Success Story : शेतकऱ्याचा मुलगा बनला विस्तार अधिकारी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com