cVIGIL App : आचारसंहितेचा टोल फ्री क्रमांक 1950 बंद! सीव्हिजिल ॲपवर तक्रार करण्याचे आवाहन

Nashik News : आयोगाच्या सीव्हिजील या ॲपवरच आता तक्रार नोंदवता येत असल्याने तक्रारींची संख्या रोडावल्याचे दिसून येते.
cVIGIL App
cVIGIL Appesakal

नाशिक : लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेविषयी तक्रार नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरु केलेला १९५० हा टोल फ्री क्रमांक फक्त ‘बीएसएनएल’ क्रमांकावरुनच लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. आयोगाच्या सीव्हिजील या ॲपवरच आता तक्रार नोंदवता येत असल्याने तक्रारींची संख्या रोडावल्याचे दिसून येते. (nashik lok sabha 2024 Appeal to complain on Cvigil app marathi news)

देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येते. त्यासाठी निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे.

या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कारवाई केली जाते. त्याशिवाय १९५० हा टोलफ्री क्रमांकही सुरु केला आहे. पण हा क्रमांक लागतच नसल्याची तक्रारी सुरु झाल्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाने टोल फ्री क्रमांक ऑपरेटर कंपनीला विचारणा केली असता, त्यांनी तांत्रिक कारण कळवले आहे.

त्यात दुरुस्ती करण्याचे काम सुरु असले तरी नेमका कधीपासून हा क्रमांक सुरु होईल, याविषयी अधिकृतपणे काहीच सांगितलेले नाही. त्यामुळे तुर्त आचारसंहितेची तक्रार फक्त बीएसएनएलच्या ग्राहकांनाच करता येईल, असे दिसते.

cVIGIL App
Marathi News Live Update: काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांचा भाजपमध्ये प्रवेश

ॲपवरच भिस्त

नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाने सीव्हिजिल (cVIGIL) ॲप सुरु केले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर हे ॲप उपलब्ध आहे. त्यावर आचारसंहिता उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचा तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ अपलोड करता येऊ शकतो. तक्रारदाराचे नाव यात गुप्त राखले जाते.

"टोल फ्री क्रमांक बीएसएनएल व्यतिरीक्त क्रमांकावरुनही लागावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच त्यातून काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे."

-डॉ.शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग, नाशिक)

cVIGIL App
Lok Sabha Code of Conduct : दीड कोटींच्या साड्या वापराविना पडून! मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न फसला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com