Nashik Lok Sabha Code of Conduct: परवानाधारकांच्या पिस्तुलांना ‘कस्टडी’! निवडणूक काळात बेकायदेशीर 45 हत्यारे जप्त

Crime News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच, पोलीस आयुक्तालय हद्दीतील परवानाधारकांना त्यांच्याकडील पिस्तुल आयुक्तालयातील परवाना शाखेकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले.
Police on Pistol Action
Police on Pistol Actionesakal

Nashik Police : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच, पोलीस आयुक्तालय हद्दीतील परवानाधारकांना त्यांच्याकडील पिस्तुल आयुक्तालयातील परवाना शाखेकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सुमारे ५०० परवानाधारकांनी त्यांच्याकडील शस्त्र पोलिसांकडे जमा केले आहेत. मात्र गेल्या महिनाभरामध्ये पोलिसांनी आयुक्तालय हद्दीमध्ये कारवाई करीत ८ गावठी कट्ट्यांसह ४५ बेकायदेशीर हत्यारे जमा करीत गुन्हे दाखल केले आहेत. (Nashik Police Custody of license holders pistols marathi news)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १६ मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू होताच, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परवाना शाखेला आदेश देत, आयुक्तालय हद्दीत शस्त्र परवाना देण्यात आलेल्यांना त्यांच्याकडील शस्त्र (पिस्तुल/रिव्हाल्व्हर) पोलीस आयुक्तालयात जमा करण्याचे आदेश दिले.

शहर आयुक्तालयाने आत्तापर्यंत १ हजार ४११ जणांना शस्त्र परवाना दिला आहे. यातील ५१२ परवानाधारकांनी त्यांच्याकडील शस्त्र काडतुसांसह पोलीस आयुक्तालयाच्या संबंधित विभागाकडे जमा केले आहेत. लोकसभा निवडणूक जूनमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर परवानाधारकांना त्यांचे शस्त्र परत केली जाणार आहेत.

मात्र त्यावेळी नियमानुसार ७० वयवर्षे असलेल्या परवानाधारकांचा परवाना रद्द केला जाणार आहे. त्याचप्रमाणे, ज्यांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेतला होता, परंतु त्यांना त्याची आवश्यकता नसल्याचे गोपनीय शाखेच्या निदर्शनास आल्यास अशा परवानाधारकांचाही परवाना रद्द केला जाणार आहे. तर, नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यातून सुमारे ४ हजार परवानाधारकांचे शस्त्र जमा करण्यात आलेले आहेत.

अवैध हत्यारांविरोधात कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणेनिहाय व शहर गुन्हेशाखेच्या पथकांकडून आयुक्तालय हद्दीत कारवाई केली जात आहे. त्यानुसार गेल्या महिन्याभरात ४५ हत्यारे जप्त केली आहेत. यात ८ गावठी कट्टे, २० काडतुसे आणि ३७ विविध प्रकारातील धारदार हत्यारे जप्त करण्यात येऊन संशयितांविरोधात आर्मॲक्टअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  (latest marathi news)

Police on Pistol Action
Nashik Police : टवाळखोरांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद! मोकळ्या मैदानांवर शहर पोलिसांचे ‘सर्च ऑपरेशन’

यांना असतो समावेश

पोलीस आयुक्तालयाकडून माजी लष्करी अधिकारी/सैनिक, शासकीय सेवेतील अधिकारी, बँकेचे सुरक्षारक्षक, खेळाडू, शेतकरी, व्यावसायिक, राजकीय व सुरक्षात्मक कारणास्तव मागणी केल्यास शस्त्र परवाना दिला जातो. मात्र, निवडणुकांच्या काळात आयुक्तांच्या आदेशानुसार ठराविक परवानाधारकांना त्यांचे शस्त्र पोलिसांकडे जमा करावे लागतात.

परवानाधारक शस्त्रांची आकडेवारी

- शासकीय अधिकारी : २४०

- आर्मी : २७०

- बँक : ६५

- सुरक्षारक्षक : २०

- खेळाडू : ३१

- शेती : ५३

- व्यावसायिक : ५१३

- राजकीय : ९७

- अन्य : १२२

एकूण : १४११

"परवानाधारकांची शस्त्रे जमा करण्यात आलेली आहे. तर, अवैधरित्या हत्यारे बाळगणार्याविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई केली जात आहे. येत्या काळात अवैध हत्यारे व धंद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. नागरिकांनी यासंदर्भातील माहिती कळवावी, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल."

- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा

Police on Pistol Action
Nashik Police : सिडको, इंदिरा नगर भागातील अवैध सावकार पोलिसांच्या रडारवर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com