Nashik Lok Sabha Constituency : अमित ठाकरे यांची मेळाव्याकडे पाठ; गैरहजेरीचा अर्थ शोधण्यात मनसैनिक व्यग्र

Lok Sabha Constituency : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनोहर गार्डन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
Amit Thackeray
Amit Thackerayesakal

Nashik : लोकसभा नाशिक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता परंतु ऐनवेळी मेळाव्याला मार्गदर्शन करणारे मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी दांडी मारल्याने ठाकरेंच्या गैरहजेरीचा नेमका अर्थ मनसैनिकांना उलगडलेला नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनोहर गार्डन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कशा पद्धतीने काम करायचे, याचे नियोजन व मार्गदर्शन केले जाणार होते.

अमित ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याने मनसैनिकांचा उत्साह शिगेला पोचला. मात्र मेळावा सुरू होण्यापूर्वी काही तास अमित ठाकरे येणार नसल्याचे समजल्यानंतर मनसैनिकांनी मेळाव्यातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली. अमित यांनी ऐनवेळी मेळाव्याकडे पाठ का फिरवली याबद्दल मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे.

महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे पूर्वी मनसैनिक होते. सुरुवातीला मनसेचे जिल्हा परिषद सदस्य व त्यानंतर महापालिकेत नगरसेवक होते. २००९ मध्ये मनसेचे लोकसभेचे उमेदवार होते. या निवडणुकीत गोडसे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. (latest marathi news)

Amit Thackeray
PM Modi Nashik Daura: कांदा प्रश्नावरून मोदींच्या सभेचे ठिकाण बदलाची शक्यता; जिल्ह्यात असंतोष, पोलिसांच्या गोपनीय शाखेचा अहवाल?

मात्र त्यानंतर गोडसे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला व सलग २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. मनसेच्या नावावर गोडसे मोठे झाल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला व खासदारकी मिळवली, हे राज ठाकरे यांच्या मनात असल्याने त्यातून गोडसे यांच्या प्रचाराला येण्यास टाळण्याचे बोलले जात आहे.

त्याचबरोबर सुरुवातीला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवरील हॉटेल सयाजी पॅलेस येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. परंतु गोडसे यांच्याकडून हॉलची बुकिंग झाले नाही व ऐनवेळी स्थळ बदलल्यानेदेखील मनसेची दखल घेत जात नसल्याचा संदेश केल्याने ठाकरे यांनी पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.

Amit Thackeray
Nashik Police : दत्तक गुन्हेगारांच्या अंमलदारांना दणका! पोलीस उपायुक्तांची कारवाई; अंबडच्या चौघांवर कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com