Nashik Lok Sabha Constituency : धुळ्याचे भाजप खासदार सुभाष भामरे भुजबळांच्या भेटीला!

Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुरेश भामरे यांनी भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
Dr. Subhash Bhamre, candidate of the BJP grand alliance in Dhule Lok Sabha constituency, while discussing with the state food and civil supplies minister Chhagan Bhujbal.
Dr. Subhash Bhamre, candidate of the BJP grand alliance in Dhule Lok Sabha constituency, while discussing with the state food and civil supplies minister Chhagan Bhujbal.esakal

Nashik News : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघामधून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतली. मात्र लोकसभेच्या नाशिक दिंडोरीसह धुळे मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांकडून भुजबळ यांच्या भेटी घेऊन मदतीचे आश्वासन पदरात पाडून घेतले जात आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुरेश भामरे यांनी भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. (BJP candidate Dr Suresh Bhamare met Bhujbal at his residence)

धुळे मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ असल्याने आपण भेट घेतल्याचे भामरे यांनी स्पष्टीकरण दिले. नाशिक, दिंडोरी व धुळे मतदारसंघासाठी सहा मे रोजी माघारी घेतल्यानंतर तीनही लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत असली तरी प्रमुख लढत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्ये आहे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दुरंगी लढत आहे.

निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराने वेग घेतला आहे. प्रचारामध्ये महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मदतीचे आश्वासन पदरात पाडून घेतले जात आहे. (Latest Marathi News)

Dr. Subhash Bhamre, candidate of the BJP grand alliance in Dhule Lok Sabha constituency, while discussing with the state food and civil supplies minister Chhagan Bhujbal.
Nashik Loksabha: नाशिकवरून वरिष्ठ नेत्यात वाक्‌युध्द; NCPचे पटेल म्हणतात, नाशिक आमचेच! सेनेचे शिरसाठ म्हणतात, आग्रह नव्हे, हट्ट!

धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव बाह्य व मालेगाव मध्य या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्या अनुषंगाने भाजपचे उमेदवार डॉ. भामरे यांनी आज भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली.

यावेळी माध्यमांशी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, महायुती म्हणून आम्ही डॉ.भामरेंच्या मागे ताकद उभी करू. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सिद्देश्वरानंद सरस्वती यांनीही भुजबळ यांची भेट घेतली.

Dr. Subhash Bhamre, candidate of the BJP grand alliance in Dhule Lok Sabha constituency, while discussing with the state food and civil supplies minister Chhagan Bhujbal.
Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com