Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituencyesakal

Nashik Lok Sabha Constituency : धुळ्याच्या उमेदवारीने जिल्हा काँग्रेसतंर्गत गटबाजी उफाळली

Lok Sabha Constituency : धुळे मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानंतर नाशिक जिल्हा काँग्रेस अतंर्गत असलेली गटबाजी उफाळून आल्याचे बघावयास मिळत आहे.

Nashik Lok Sabha Constituency : धुळे मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानंतर नाशिक जिल्हा काँग्रेस अतंर्गत असलेली गटबाजी उफाळून आल्याचे बघावयास मिळत आहे. डॉ. बच्छाव यांच्या उमेदवारी नाराज झालेल्या काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी राजीनामा दिला आहे. (Nashik Dhule candidature has erupted factionalism within district Congress )

राजीनामा दिल्यानंतर, त्यांची समजूत काढण्याची तयारी सुरू असताना जिल्हा ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांकडून मात्र, जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांच्या राजीनामा मंजुर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयानुसार ही उमेदवारीची सूचना होती.

विधीमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील आढाव्यानुसार डॉ. बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. या मतदारसंघात धुळ्याचे श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे हे अन्य इच्छुक उमेदवार होते. डॉ. शेवाळे यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या होत्या.

मात्र, डॉ. बच्छाव यांचे नाव पुढे आल्यानंतर, डॉ. शेवाळे यांनी बाहेरचा उमेदवार देऊ नये अशी मागणी केल्याने परका व स्थानिक असा वाद सुरू झाला होता. यातच डॉ. बच्छाव यांनी उमेदवारी दिली गेल्याने नाराज झालेल्या डॉ. शेवाळे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षाने बाहेरचा उमेदवार दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी राजीनामा पक्षाकडे पाठविला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातंर्गत खळबळ उडाली.(latest marathi news)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency: नाशिक, दिंडोरीत काँग्रेस 25 वर्ष उमेदवारीपासून वंचित

गटनेते थोरात यांनी याबाबतची माहिती मिळाली असल्याचे सांगत, पक्षाच्या वरिष्ठांची याबाबत चर्चा केली जाईल. राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांचा राजीनामा मंजुर करण्याची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे.

डॉ. शेवाळे यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा घेतल्यापासून जिल्ह्यात पक्षाचे संघटन नाही, पक्षाची बैठक घेत नाही, पाच वर्षात जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली नाही अशा तक्रारी त्यांच्या विरोधात होत्या. त्यांच्या कारकिर्दीत पक्षाची अवस्था दयनीय झाली असून जिल्हाध्यक्ष यांना बदलण्यात यावे अशी मागणीही अनेकदा प्रदेश दरबारी झाली होती.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्हा नेतृत्वाच्या कामावर नाराजी व्यक्त करत, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले होते. मात्र, त्यांना हटविण्यात येत नसल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. यातच डॉ. शेवाळे यांनी राजीनामा दिला आहे तर, त्यांचा राजीनामा मंजूर करावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रदेश नेत्यांकडे केल्याचे बोलले जात आहे.

प्रभारी जिल्हाध्यक्ष द्या

दरम्यान, लोकसभा निवडणूक असल्याने नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्याऐवजी नाशिक शहराच्या धर्तीवरच प्रभारी जिल्हाध्यक्षांची तात्पुरती नियुक्ती करावी अशी मागणी काही वरिष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केल्याचे वृत्त आहे.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरी मतदारसंघात उमेदवारीत कोकणा समाजाचे वर्चस्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com