SAKAL Special : चालता बोलता! सूत्रसंचालक बाईंचे मत नेमके कोणाला?

SAKAL Special : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असून यासाठी दोन्ही बाजूने दिव्याची नेत्यांनी प्रचारात पुढे घेतली आहे.
anchor
anchor esakal

चालता बोलता! सूत्रसंचालक बाईंचे मत नेमके कोणाला?

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असून यासाठी दोन्ही बाजूने दिव्याची नेत्यांनी प्रचारात पुढे घेतली आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली. महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये उठाव ठाकरे यांची सभा झाली.

दोन्ही विरोधकांच्या सभेच्या व्यासपीठावर शहरातील सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध असलेल्या मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. दोन्ही व्यासपीठावरून उपस्थित नेत्यांचे उमेदवारांचे कौतुक केल्याने, आता या सूत्रसंचालक बाई मत कोणाला देणार अशी चर्चा सामान्यांमध्ये रंगली होती.

(Nashik Lok Sabha Constituency)

anchor
SAKAL Special : चालता-बोलता! आम्ही करतोय तेवढे उद्योग पुरे

असेच करावे लागते...

मतदान हा लोकशाहीने बहाल केलेला मूलभूत अधिकार आहे. त्याबळावरच आपली लोकशाही टिकून आहे आणि तिला अधिक बळकट करायचे झाले, तर प्रत्येकाने मतदान करायला हवे. तुम्हाला वाटत असेल, की हे सर्व तत्त्वज्ञान आम्हाला माहीत आहे. मग त्यात वेगळेपण काय? त्याचे झाले असे, की जिल्हाधिकारी कार्यालयातील एक उच्चाधिकारी सोमवारी मतदानासाठी आपल्या मूळ गावी गेले.

मतदान केंद्रावर पोचताच लांबलचक रांग लागलेली. बराच वेळ उभे राहिल्यानंतर मतदानासाठी नंबर लागला. मतदान स्लीप दाखवून नाव लिहिले अन्‌ इतक्यात एका दिव्यांग मतदाराचा मुलगा तिथे प्रकटला. त्याने आईचे नाव सांगितले. त्यांना इथपर्यंत येणे शक्य नसल्याचेही सांगितले. मग मतदान कसे करणार म्हणून विचारणा केली. तर मीच त्यांचे मतदान करतो, असेही तो म्हणाला. इथपर्यंत सगळे ठीक वाटू शकते.

पण खरी गंमत त्यापुढे आहे. मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेण्यासाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी थेट गाडीपर्यंत गेल्या. त्या गेल्यामुळे इकडे कामकाज थांबले. त्यांना येण्यासाठी तब्बल २० मिनिटांचा अवधी लागला. असे जाता येते का म्हणून त्यांना विचारले, तर त्या बाई म्हणतात, मतदानासाठी असेच करावे लागते. अधिकाऱ्यांनीही कपाळावर हात मारला नसेल तर नवलच!

anchor
SAKAL Special : चालता-बोलता! दुचाकीऐवजी पत्नीचा फोटो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com