Nashik Lok Sabha Constituency: मुख्यमंत्र्यांनी बोरस्ते यांना मुंबईत बोलावल्याची चर्चा! खासदार गोडसेही तत्काळ दाखल

Political News : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दोन दावेदार तयार झाले आहेत
Ajay Boraste, Hemant Godse & Cm Eknath Shinde
Ajay Boraste, Hemant Godse & Cm Eknath Shindeesakal

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दोन दावेदार तयार झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना मुंबईला बोलावल्याच्या चर्चेचा शहरात वास आल्यानंतर तातडीने विद्यमान खासदार हेमंत गोडसेही मुंबईत दाखल झाले. (Loksabha Election 2024) यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये अद्याप निश्चित नसताना शिवसेनेच्या शिंदे गटात स्पर्धा पाहायला मिळत आहे. (Nashik Lok Sabha Constituency CM invited Ajay Boraste to Mumbai news)

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा तिढा सुटत असताना नाशिकमध्ये मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या सर्वेक्षणात आमदार ॲड. राहुल ढिकले यांचे नाव आघाडीवर असल्याने भाजपकडून या जागेवर दावा करण्यात आला. त्यापाठोपाठ दहा वर्षांपासून शिवसेनेचा खासदार असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीदेखील नाशिकची जागा शिवसेनेकडे राहणार असल्याचा दावा करताना खासदार गोडसे यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त करीत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या.

खासदार शिंदे यांच्या घोषणेनंतर नाशिक जिल्ह्यात पाच आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचादेखील दावा असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून पेच निर्माण झाला होता. नाशिकच्या जागेचा अद्याप तिढा सुटलेला नाही.

नाशिकच्या जागेसंदर्भात भाजपने ‘वेट अॅन्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटालाच जागा मिळेल, असा ठाम विश्वास शिवसेनेच्या नेत्यांना आहे. त्यातून आज जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना मुख्यमंत्र्यांकडून बोलावणे आल्याची चर्चा सुरू झाली. ते तातडीने मुंबईला गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेनेला जागा सुटेल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. (Nashik Political news)

Ajay Boraste, Hemant Godse & Cm Eknath Shinde
Nandurbar Lok Sabha Constituency : नटावद गावाने दिले आतापर्यंत 3 खासदार; स्वातंत्र्यानंतरचे पहिले खासदार ठरले जयंत नटावदकर

बोरस्तेंपाठोपाठ गोडसे मुंबईत

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना मुख्यमंत्र्यांकडून तातडीने मुंबईला बोलावण्यात आल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले. दुपारनंतर खासदार गोडसे यांनीदेखील कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटामध्येच नाशिकच्या जागेसाठी स्पर्धा सुरू झाल्याचे आज दिसून आले.

"अजय बोरस्ते यांनी मुंबईमध्ये माझ्याच उमेदवारीसाठी वेळ घेतली असून, त्यामुळे त्यामध्ये काही वावगे नाही."- हेमंत गोडसे, खासदार

मोदी व्हावेत पंतप्रधान, नाशिकमध्ये हवी शिवसेना!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील कोपरीत अंबामातेच्या आरतीचा मान नाशिक शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाला. या वेळी नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी आरती केली. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होऊ दे आणि नाशिकमधून शिवसेनेचा खासदार होऊ दे, असे साकडे शिवसेनेने अंबामातेला घातले. नाशिकच्या उमेदवारीबाबत निर्णय प्रलंबित असल्याने शिवसेनेने साधलेली ही संधी राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

Ajay Boraste, Hemant Godse & Cm Eknath Shinde
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव मतदारसंघात दुरावलेली मने जुळली; करण पवारांना पक्षांतराचा निर्णय लाभदायक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com