Nashik Lok Sabha Constituency : शिवसेना फुटीनंतर ठाकरेंचा दिल्लीला फोन

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी गुवाहाटी गाठल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत फोन करून आम्ही सोबत येण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra Fadnavisesakal

Nashik News : महाविकास आघाडीतून बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी गुवाहाटी गाठल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत फोन करून आम्ही सोबत येण्यास तयार असल्याचे सांगितले होते. (Nashik Lok Sabha Constituency)

पण तोपर्यंत शिवसेना बाहेर पडलेली असल्यामुळे त्यांचा हा डाव फसल्याची कबुली देत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटाची मुख्यमंत्री शिंदेंनी पाठराखण केली. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीतील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता. २) दाखल केला.

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, शिवसेना नेते संजय शिरसाट उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदेंसह आमदार सत्तेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांची री ओढत म्हणाले, की आम्ही बाहेर पडलो, तेव्हा ठाकरेंनी प्रयत्न केले. आम्हाला फोन आले. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Nashik Lok Sabha Constituency : शांतिगिरी महाराजांच्या माघारीसाठी संकटमोचक ‘जनशांती धाम’मध्ये

तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो. तुम्ही परत या. मात्र, मी मुखमंत्री होण्यासाठी हा निर्णय घेतला नव्हता. ज्यावेळी बाळासाहेबांच्या विचारांची फारकत घेतली गेली, त्या वेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो होतो. मलाही निरोप दिला होता.

दिल्लीला देखील त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, की यांना कशाला घेता आम्हीच येतो, अख्खी शिवसेना तुमच्यासोबत येईल. मात्र तोपर्यंत त्यांच्याकडे शिवसेना राहिलीच नव्हती. त्यामुळे फडणवीस बोललेत, त्यात वस्तूस्थिती असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत. मात्र त्या मी बोलू इच्छित नसल्याचे त्यांनी म्हटले.

टोमण्यांशिवाय त्यांना काम नाही

विरोधकांकडे आता कुठलेही काम उरलेले नाही. शिव्याशाप आणि डिवचणे इतकेच काम त्यांच्याकडे उरलेले आहे. आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे काहीच उरणार नाही. आता सरकार बदललेले आहे हे अजून विरोधक मानायला तयार नाही, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Nashik Lok Sabha Constituency : गोडसे कुटुंबीयांकडे 16 कोटींची संपत्ती; गेल्या 5 वर्षांत अचल संपत्तीत काहीशी घट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com