Nashik Lok Sabha Constituency : रात्री प्रवेश, सकाळी उपनेते, दुपारी माघार; विजय करंजकर शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल

Lok Sabha Constituency : माजी जिल्हाध्यक्ष व लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ५) रात्री शिंदे गटात प्रवेश केला.
Vijay Karanjkar entered Shinde group on Sunday  night in presence of Chief Minister Eknath Shinde and dada bhuse
Vijay Karanjkar entered Shinde group on Sunday night in presence of Chief Minister Eknath Shinde and dada bhuse esakal

Nashik News: लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून शिवसेनेकडून (ठाकरे गट) इच्छुक असलेले माजी जिल्हाध्यक्ष व लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ५) रात्री शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर सोमवारी (ता. २६) सकाळी त्यांची उपनेते व नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाली. (Nashik Lok Sabha Constituency)

त्यानंतर करंजकर तातडीने नाशिकला दाखल झाले व जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. करंजकर यांच्या प्रवेशाच्या वेगवान प्रक्रियेमुळे महायुतीच्या नेत्यांच्या बाहूंमध्ये स्फुरण चढले आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर शिवसेनेकडून (ठाकरे गट) नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना तसा शब्दही दिल्याचा त्यांचा दावा आहे.

त्यामुळे वर्षभरापासून ते निवडणुकीचा प्रचार करत होते. इगतपुरी व सिन्नर मतदारसंघ तसेच नाशिक तालुका मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला. मात्र शिवसेनेकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ ऊर्फ पराग वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे करंजकर यांनी शिवसेनेच्या बैठकांकडे पाठ फिरवत नाराजी व्यक्त केली. करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु आधी प्रवेश करा, त्यानंतर निर्णय घेऊ, असेही त्यांना सांगण्यात आले.

दरम्यान, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे करंजकर यांनी देवळाली कॅम्प भागात शक्तिप्रदर्शन केले. त्या वेळी जवळपास पाच हजार समर्थकांनी मेळाव्याला हजेरी लावली. करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्जदेखील दाखल केला. त्यामुळे महायुतीसमोर काही भागात आव्हान निर्माण झाले.

उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्याने महायुतीकडून यातही विशेषत: शिंदे गटाकडून ताकही फुंकून पिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम करणाऱ्या घटकाला बरोबर घेण्याचा जोरदार प्रयत्न आहे. करंजकर यांच्या समर्थकांचा मेळावा लक्षात घेऊन शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तत्काळ करंजकर यांची भगूर येथील निवासस्थानी भेट घेऊन प्रवेशाचे साकडे घातले. (Latest Marathi News)

Vijay Karanjkar entered Shinde group on Sunday  night in presence of Chief Minister Eknath Shinde and dada bhuse
Nashik Lok Sabha Constituency : नाशिकमध्ये तिरंगी, तर दिंडोरीत दुरंगी लढत!लोकसभा निवडणुकीचे माघारीनंतर चित्र स्पष्ट

करंजकर यांनीदेखील संघटनात्मक पद तसेच आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीचा शब्द पदरात पाडून घेत प्रवेशास होकार दिला. रविवारी रात्री तातडीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. पहाटे करंजकर व अन्य नेते नाशिकमध्ये दाखल झाले.

सकाळी करंजकर यांची जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती, तर दुपारी करंजकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते, सहसंपर्कप्रमुख सूर्यकांत लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

ठाकरे गटाला सुरुंग

विजय करंजकर यांच्याबरोबर इगतपूरीचे उपतालुकाप्रमुख पंडित कातोरे, दत्तात्रय गुंजाळ, विधानसभा संघटक विनोद भागडे, वाडीवऱ्हेचे गटप्रमुख दिलीप मुसळे, युवा सेनेचे इगतपुरी सरचिटणीस विकास शिरसाठ, संकेत कोरडे, बाळासाहेब गोवर्धने, भूषण जाधव, नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक भागवत आरोटे, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, भगूर शहरप्रमुख विक्रम सोनवणे, सभापती रंगनाथ कचरे, विधानसभा निरीक्षक मोहन बहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय तुंगार, बबन कांगणे, संदीप गणोरे, योगेश गांगुर्डे यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केला.

Vijay Karanjkar entered Shinde group on Sunday  night in presence of Chief Minister Eknath Shinde and dada bhuse
Nashik Lok Sabha Constituency : गोडसे, वाजेंसह 2 महाराज नाशिकच्या आखाड्यात; करंजकर, अरिंगळेंसह 5 इच्छुकांची माघार

आतातरी आत्मपरिक्षण करा : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करंजकर यांचे स्वागत केले. आमच्यावर गद्दारीचे आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता तरी आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. तुम्ही त्यांच्याबरोबर होतात तोपर्यंत निष्ठावान होतात, आता इकडे आल्यावर ते तुम्हाला कचरा म्हणतील. त्यांची वृत्ती तशीच असल्याने लक्ष देऊ नका.

१३ खासदार, ४० आमदार, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य येत आहेत, हे सगळे लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर असे होऊ शकते का? मी काही त्यांना सल्ले देत नाही. ते तर सर्वोच्च न्यायालयालाही सल्ले देतात, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

उपयांनी शिवसेना संपविली : करंजकर

शिवसेना वाढविण्यासाठी चाळीस वर्षे जिवाचे रान केले. मात्र बाळासाहेबांनी वाढविलेल्या पक्षाला आता वाळवी लागली आहे. ज्यांनी माझा घात केला. त्यांचाही घात केल्याशिवाय मी राहणार नाही, असे करंजकर यांनी सांगितले. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर करंजकर यांनी डागाळलेला माणूस अशी टीका केली. त्याला उत्तर देताना नाशिकमध्ये उपयांनी शिवसेना संपविल्याची टीका करंजकर यांनी केली. मी येथील भूमिपुत्र आहे. भूमिपुत्र काय करू शकतो, हे मी त्यांना दाखवून देईल. आता ठाकरे गटाच्या उमेदवाराला नडणार आणि पाडणार, असा इशाराही करंजकर यांनी दिला.

Vijay Karanjkar entered Shinde group on Sunday  night in presence of Chief Minister Eknath Shinde and dada bhuse
Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीत ‘तोफा’ धडाडणार; पंतप्रधानांची सभा 17 ला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com