Nashik Lok Sabha Election : निवडणूक प्रक्रियेसाठी लागणार 1772 वाहने

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, दुसरीकडे प्रशासकीय तयारीलाही वेग येत आहे.
 Lok Sabha Election
Lok Sabha Election esakal

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, दुसरीकडे प्रशासकीय तयारीलाही वेग येत आहे. मतदानाच्‍या दिवशी नियुक्‍त अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहतूक तसेच मतदान साहित्‍याच्‍या दळणवळणासाठी एक हजार ७७२ वाहनांची आवश्‍यकता भासणार आहे. याअनुषंगाने वाहने अधिग्रहित करण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात केली आहे. निवडणूक कामात आवश्‍यक असलेल्‍या वाहनांमध्ये प्रामुख्याने एसटी बसचा समावेश असून, यासह ट्रक, टॅक्‍सी आणि इतर वाहनांचा समावेश आहे. (Nashik Lok Sabha Election 1772 vehicle required for election process in city marathi news)

निर्धारित वाहने अधिग्रहित करण्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी अशा दोन्ही मतदारसंघांत एकाच वेळी २० मेस मतदान होणार आहे. त्‍या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेकडून तयारी सुरू आहे. जिल्‍हाभरातील चार हजार ८०० मतदान केंद्रे अंतिम केली असून, निवडणूक प्रक्रियेकरिता सुमारे ३१ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

मतदानाच्‍या दिवशी संबंधित केंद्रापर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी तसेच मतदानाचे साहित्य, ईव्‍हीएम मशिन वाहतुकीसाठी वाहनांची आवश्‍यकता असेल. मतदानाच्या एक दिवस आधीपासूनच ही वाहने अधिग्रहित करण्याचे निर्देश आहेत.(latest marathi news)

 Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा उबाठा गटाची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना जाहीर

इतकी वाहने करणार अधिग्रहित

बस - ५६०

मिनी बस- ८९

टॅक्‍सी/जीप- ९५२

चारचाकी वाहने- १२७

ट्रक- ४४

 Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : मी लढणार म्हणजे लढणारच अन् पाडणारही; नाराज करंजकर यांचे बंडखोरीचे संकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com