Nashik Lok sabha Election: शहरात केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या दाखल! लोकसभा निवडणूक बंदोबस्त; कडेकोट नियोजन अंतिम टप्प्यात

Lok Sabha Election 2024 : राज्यभरातून सुमारे तीन ते साडेतीन हजार पोलिसांची जादा कुमक येत्या काही दिवसात शहरात दाखल होणार आहे. यामुळे शहराला पोलिस छावणीचे स्वरूप येणार आहे.
CRPF file photo
CRPF file photoesakal

Nashik Lok sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक, दिंडोरी मतदार संघासाठी येत्या २० तारखेला मतदान होते आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार निवडणूक काळात घडू नये यासाठी शहरात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) पाच तुकड्या दाखल झाल्या आहेत. तसेच, राज्यभरातून सुमारे तीन ते साडेतीन हजार पोलिसांची जादा कुमक येत्या काही दिवसात शहरात दाखल होणार आहे. यामुळे शहराला पोलिस छावणीचे स्वरूप येणार आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 CRPF entered city)

लोकसभा निवडणुकीच्या नाशिक, दिंडोरी मतदारसंघातील प्रचाराचा येता आठवडा अखेरचा असणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षांचे नेत्यांच्या प्रचार सभा शहर-जिल्ह्यात होणार आहेत. त्याचप्रमाणे, शहर-जिल्ह्यातील मतदान केंद्रांचीही पाहणी सुरू असून, तयारी अंतिम टप्प्यात आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांची पथके बंदोबस्ताचे नियोजन करीत आहेत. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी हद्दीतील सर्व मतदान केंद्रांसह तेथील सुरक्षा व्यवस्थेचा अहवाल आयुक्तालयास दिला आहे.

त्यानुसार अतिरिक्त कुमक आणि शहरातील तीन हजार पोलिसांचे मनुष्यबळ यांचा एकत्रिक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या पोलिसांच्या निवासासह भोजनाची व्यवस्था मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची पथके करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सीआरपीएफच्या पाच तुकड्या दाखल झाल्या आहेत. एका तुकडीत शंभर जवान असून, सीआयएसएफची तुकडी महिनाभरापासून शहरात तळ ठोकून आहे. यासह अतिरिक्त मनुष्यबळ दाखल होणार आहे. (latest marathi news)

CRPF file photo
Nashik Lok Sabha Constituency : कांदा प्रश्नावरून मोदींच्या सभेचे ठिकाण बदलाची शक्यता; पोलिसांच्या गोपनीय शाखेचा अहवाल

अतिरिक्त बंदोबस्त

- राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्या
- केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) सात तुकड्या
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) तुकडी
- १ हजार होमगार्ड; दंगल नियंत्रण, जलद प्रतिसाद पथक
- पाचशे पोलिस अधिकाऱ्यांचा अतिरिक्त फौजफाटा
- दीड-दोन हजार कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक

सहायक आयुक्तांकडे जबाबदारी

शहरात दाखल झालेल्या सीआरपीएफ व एसआरपीएफच्या तुकड्या प्रत्येक सहायक आयुक्तांच्या कार्यालयीन पथकासमवेत असतील. त्याचप्रमाणे, प्रत्येकी एक तुकडी मुख्यालयात बॅकअपसाठी सज्ज राहील. मतदानावेळी फिरते पथक, गस्ती पथक, संवेदनशील ठिकाणे, ‘स्ट्राँग रुम’ यासह संवेदनशिल ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त असेल. मतदानाच्या दिवशी सहायक आयुक्तांची पथके हद्दीत सकाळी सहापासून सायंकाळी मतदान संपेपर्यंत गस्त घालतील.

CRPF file photo
Nashik Police : दत्तक गुन्हेगारांच्या अंमलदारांना दणका! पोलीस उपायुक्तांची कारवाई; अंबडच्या चौघांवर कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com