Nashik Lok Sabha Election 2024 : विकास, शेती तर कधी जातीच्या हिंदोळ्यावर हेलकावे

Lok Sabha Election : पुर्वीच्या नाशिक लोकसभा मतदारसंघात निफाड, येवला या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता.
Nashik Lok Sabha Election 2024 :
Nashik Lok Sabha Election 2024 :esakal

Nashik Lok Sabha Election 2024 : पुर्वीच्या नाशिक लोकसभा मतदारसंघात निफाड, येवला या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. त्यामुळे शेती यातही विशेषत: कांदा हा विषय जिव्हाळ्याचा राहायचा. शहरी मतदारसंघ जोडले गेल्यानंतर विकासाचा मुद्दा समोर आला तर सन २०१४ च्या निवडणुकीत जात फॅक्टरने नाशिक मतदारसंघ ढवळून निघाला. त्यामुळे कधी शेती, कधी विकास, कधी जात तर कधी लाटेवर हेलकावे खात राहिलेला हा मतदारसंघ कुठल्याच एका विषयाला चिकटून राहिला नाही. (Nashik Lok Sabha Election 2024 Development agriculture in Constituency marathi news)

नाशिक लोकसभा मतदारसंघात पुर्वी नाशिकसह देवळाली, सिन्नर, निफाड, येवला व नगरच्या अकोला तालुक्याचा समावेश होता. नाशिक शहरात नाशिक व देवळाली हे दोनच विधानसभा मतदारसंघ होते. परंतू सन २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली. नाशिक शहरात नाशिक पुर्व, नाशिक पश्‍चिम, नाशिक मध्य व देवळाली हे चार विधानसभा मतदारसंघ तयार झाले. सिन्नर व पुर्वी ठाणे ग्रामीणला जोडलेले इगतपुरी नाशिक लोकसभा मतदारसंघात आले.

निफाड व येवला आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला जोडले गेले. निफाड शेतीबहुल विधानसभा मतदारसंघ असल्याने अवकाळी पाऊस, कांदा निर्यात किंवा पडलेले भाव हे महत्वाचे मुद्दे लोकसभा निवडणुकीत महत्वाचे ठरायचे. तर येवला तालुक्यात लासलगावसह चाळीस गावांचा विकास, दुष्काळ हे महत्वाचे मुद्दे नाशिक लोकसभा मतदारसंघात गाजायचे. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Election 2024 :
Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचारही महागला; व्हेज 150 तर नॉनव्हेज 250 रुपये थाळी

अकोले तालुक्यात दुष्काळ व शेतीचे मुद्दे नाशिक मतदारसंघावर प्रभाव पाडायचे. नाशिक लोकसभेत तीनही विधानसभा मतदारसंघ जावून नवीन पुनर्रचनेत शहरी मतदारसंघाचां समावेश झाल्यानंतर विकासाचे मुद्दे महत्वाचे ठरले. महापालिकेसाठी निधी आणण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रासाठी भुसंपादन, नाशिक-पुणे व नाशिक-मुंबई रेल्वे विस्तार, महामार्गाचे विस्तारीकरण, आयटी पार्क व विमानसेवा या मुद्यांना महत्व आले.

शेतीचे मुद्दे नाशिक तालुक्यापुरते मर्यादीत राहिले. सिन्नर दुष्काळी तालुका असल्याने या तालुक्यात पिण्याच्या पाण्याकडे लक्ष केंद्रीत झाले. इगतपुरी विधानसभा मतदारसंघ पुर्वीपासूनच पाणी व शेतीच्या बाबतीत सधन आहे. येथे महादेव कोळी व कोकणा या मतांचा अधिक प्रभाव असल्याने त्याभोवती निवडणुकीचे वातावरण केंद्रीत होते.

‘जात' फॅक्टरने घेतली जागा

सन २०१४ च्या निवडणुकीत जात हा फॅक्टर गाजला. त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत मराठा हा मुद्दा अधिक चर्चेला आल्यानंतर त्या मुद्याभोवती निवडणुक केंद्रीत झाली. गोडसे यांना चार लाख ९४ हजार ७३५ मते पडली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भुजबळ यांना तीन लाख सात हजार ३९९ मतदान झाले.या निवडणुकीत प्रथमच जात फॅक्टर अधिक चर्चेला गेला. विकासाकडून जातीच्या हिंदोळ्यावर स्वार झालेला नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्यात त्यावेळी अधिक चर्चेला आला.

Nashik Lok Sabha Election 2024 :
Nashik Lok Sabha Election 2024 : आमदार रोहित पवारांच्या मुक्कामाने महाविकास आघाडीत धडकी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com