Lok Sabha Election 2024 : रावेरमध्येही रंगणार नणंद विरुद्ध भावजय सामना? बंद दरवाजाआड गुप्तगूने चर्चेला उधाण

Lok Sabha Election 2024 : नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार गट) शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात बुधवारी (ता. १३) बंद दाराआड चर्चा झाली.
raksha khadse and rohini khadse
raksha khadse and rohini khadseesakal

Lok Sabha Election 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करताच नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार गट) शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात बुधवारी (ता. १३) बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत काय मुद्दे आले हे समजू शकले नाही. परंतु, रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यावर पुढील रणनीती ठरविण्यासाठी बैठक झाल्याचे समजते. (nashik Lok Sabha Election 2024 raksha khadse and rohini khadse marathi news)

याच बैठकीत रोहिणी खडसे यांना ‘राष्ट्रवादी’कडून उतरविण्याबाबतही विचारविनिमय झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बारामतीपाठोपाठ रावेर मतदारसंघातही नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गत काही दिवसांपासून दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू होती.

खुद्द रक्षा खडसे यांनीच सासऱ्यांनी भाजपमध्ये परत यावे, असे आवाहन केले होते; परंतु खडसे यांची भाजपविरोधातील वक्तव्ये पाहता रक्षा खडसे यांना भाजप पुन्हा तिकीट देते का, असाही प्रश्न उपस्थित होत होता; परंतु भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी देत पुन्हा रिंगणात उतविले आहे. या उमेदवारीने महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण केला आहे, त्यावर एकनाथ खडसे व रोहिणी खडसे बुधवारी उशिराने तातडीने नाशिक दौऱ्यावर असलेले ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी शहरात दाखल झाले.  ( latest marathi news )

raksha khadse and rohini khadse
Jalgaon Lok Sabha Election 2024 : खानदेशात 3 खासदारांना हॅटट्रिकची संधी

रात्री उशिरापर्यंत बंद दरवाजाआड या तीन नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत काय मुद्दे आले, हे समजू शकले नाही. दरम्यान नाशिक महापालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली भोसले यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्‍वादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

आता पुढे काय?

रक्षा खडसे यांना एकनाथ खडसे छुपा पाठिंबा देतात की त्यांच्याविरोधात प्रचार करतात, यावरून राज्यातील राजकारण रंगेल. आता शरद पवार कमी ताकदीचा उमेदवार देतील, की अन्य निर्णय घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

raksha khadse and rohini khadse
Lok Sabha Election 2024 : लोकशाहीसाठी भाजपचा पराभव व्हावा - डी. राजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com