Nashik Lok Sabah Election : उमेदवारांना 3 टप्प्यांमध्ये खर्च सादर करण्याचे आदेश; पहिला टप्पा गुरुवारी

Lok Sabah Election : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्च करण्यासाठी ९५ लाखांची मर्यादा असल्याने त्यांच्या प्रत्येक खर्चावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष राहणार आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha Election esakal

Nashik Lok Sabah Election : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्च करण्यासाठी ९५ लाखांची मर्यादा असल्याने त्यांच्या प्रत्येक खर्चावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष राहणार आहे. नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराला आपला खर्च तीन टप्प्यांत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा व अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिले. ( Candidates ordered to submit expenses in 3 phases )

नाशिकमधील उमेदवारांना निवडणूक खर्च तपासणीसाठी गुरुवारी (ता. ९) जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी साडेदहा ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते पाच या वेळेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. १४ व १८ मेस याच वेळेत शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी नियोजित वेळेत उपस्थित राहून त्यांच्या खर्चाचा हिशेब सादर करावा, असे पत्रकात म्हटले आहे. अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. (latest marathi news)

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election 2024: सिन्नरला 1 लाख 28 हजार युवा मतदार! शंभरीपार 143 तर 4019 नव मतदारांची नोंद

दिंडोरीतील उमेदवारांना खर्च तपासणीसाठी ९, १३ व १७ मेस सकाळी साडेदहा ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते पाच या दोन सत्रांत शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी पारधे यांनी केले आहे. अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

हे कागदपत्र ठेवा सोबत

- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रदान केलेले ओळखपत्र

- अभिलेखे, खर्चाचे रजिस्टर, मूळ प्रमाणके, अद्ययावत बँक पासबुक

- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली परवानगीपत्रे

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com