Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे पंधरा दिवस शिल्लक असताना मतदान यंत्र व इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था पूर्ण झालेली नाही.
Lok Sabha Election
Lok Sabha Election esakal

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे पंधरा दिवस शिल्लक असताना मतदान यंत्र व इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था पूर्ण झालेली नाही. किमान दोन हजार ३२८ वाहनांची आवश्‍यकता असताना केवळ १३६ वाहने उपलब्ध झाली आहेत. उर्वरित दोन हजार १९२ वाहनांची जुळवाजुळव केली जात आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी येत्या २० मेस मतदान होणार आहे. ()

या दोन्ही मतदारसंघांसह धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य, बाह्य व बागलाण हे तीन विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यात येतात. संपूर्ण जिल्ह्यात एकूण चार हजार ८०० मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी दिंडोरी लोकसभेत एकूण एक हजार ९२२ मतदान केंद्रे, तर नाशिक लोकसभेत एकूण एक हजार ९१० मतदान केंद्रे आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने २९ हजार ६६५ कर्मचाऱ्यांची केंद्रनिहाय नियुक्ती केली आहे.

मतदानाचे साहित्य नेण्यासाठी ५२४ बस, ९२ मिनी बस, ३४ टेम्पो, एक हजार ३५७ जीप व ३२१ क्रूझरची आवश्‍यकता आहे. त्यापैकी केवळ १३६ गाड्या सध्या उपलब्ध झाल्या आहेत. अजूनही दोन हजारांवर गाड्याची शोधाशोध करावी लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या उपलब्ध करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. (latest marathi news)

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : नाशिकच्या जागेसंदर्भात राष्ट्रवादीची आज बैठक

वाहनांचा प्रकार....आवश्‍यक वाहने....उपलब्ध वाहने

बस.....................५२४.............३१

मिनी बस..............९२..................६

टेम्पो-ट्रक.............३४..................६

जीप....................१३५७.............८२

क्रूझर जीप............३२१.................११

एकूण....................२३२८...........१३६

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : भाजपच्या पराभवासाठी दिंडोरीतून माकपची माघार; राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com