Nashik Lok Sabha Election : जे. पी. गावितांचे ‘वेट ॲन्ड वॉच’; दिंडोरीच्‍या जागेसाठी ‘माकप’चा दावा कायम

Lok Sabha Election : इंडिया आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्‍या भास्‍कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली असताना माजी आमदार जे. पी. गावित यांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे.
J.P Gavit
J.P Gavitesakal

Nashik Lok Sabha Election : इंडिया आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्‍या भास्‍कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली असताना माजी आमदार जे. पी. गावित यांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्‍या जागेसाठी माकपचा दावा कायम असून, रविवारी (ता. ३१) यासंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी पक्ष कार्यालयात बैठक झाली. (Nashik Lok Sabha Election CPM claim for Dindori seat remains marathi news)

दरम्‍यान, राज्‍यस्‍तरावर पाठपुरावा सुरू ठेवणार असून, प्रसंगी माकपतर्फे निवडणूक लढविण्याची तयारी ठेवणार असल्‍याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्‍यातील दिंडोरीची एकमेव जागा मार्क्सवादी कम्‍युनिस्‍ट पक्षाला सोडावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आमदार जे. पी. गावित यांनी केली होती. मात्र इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्‍या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातर्फे या मतदारसंघावर दावा होता.

पक्षातर्फे जाहीर केलेल्‍या उमेदवारांच्‍या यादीत भास्‍कर भगरे यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली होती. तत्‍पूर्वी इंडिया आघाडीचे उमेदवार म्‍हणून माजी आमदार गावित यांनी प्रचारालादेखील सुरवात केलेली होती. दरम्‍यान, शनिवारी (ता. ३०) भगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्‍यानंतर माकपतर्फे बैठक घेण्यात आली. (latest marathi news)

J.P Gavit
Nashik Lok Sabha Election : गद्दारांना धडा शिकवा; वाजेंच्या भेटीत उद्धव ठाकरे यांचे आवाहन

सायंकाळी उशिरापर्यंत चर्चा झाल्‍यानंतरही अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला नाही. अद्याप उमेदवार अर्ज भरण्याच्‍या प्रक्रियेला वेग आला असून, राज्‍यस्‍तरावर पाठपुरावा करत ही जागा मिळविणारच, तसेच इंडिया आघाडीकडून दाद न मिळाल्‍यास माकपचे उमेदवार म्‍हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी असल्‍याचेही सांगण्यात आले आहे.

...अन्‌ पत्रकार परिषद रद्द

दरम्‍यान, माकपची भूमिका जाहीर करण्यासाठी रविवारी सकाळी साडेअकराला पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. नंतर वेळेत बदल करून दुपारी चारला पत्रकार परिषद घेणार असल्‍याचे सांगण्यात आले. परंतु ठोस निर्णय झालेला नसल्‍याने पुन्‍हा एकदा पत्रकार परिषद रद्द करण्याचे सांगण्यात आले.

J.P Gavit
Nashik Lok Sabha Election : भाजपच्या धक्का तंत्राने शिंदे गटाला झटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com