Nashik Lok Sabha Election : डॉ. भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी होणार लढत; महाविकास आघाडीकडून उमेदवारीची घोषणा

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीबाबत विशेष लक्ष घातले.
Dr. Bharti Pawar, Bhaskar Bhagre
Dr. Bharti Pawar, Bhaskar Bhagreesakal

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीबाबत विशेष लक्ष घातले. त्यामुळे उमेदवारीबाबत इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली होती. अखेर आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता महायुतीकडून भारती पवार आणि महाविकास आघाडी कडून भास्कर भगरे अशी लढत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. (Nashik Lok Sabha Election)

भाजपाकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवित त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. डॉ. पवार यांना उमेदवारी मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून विशेषतः शरद पवार यांच्याकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू होता. माकपाचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी देखील दर्शवली होती.

भाजपकडून इच्छुक असलेले अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एन.डी. गावित यांच्या नावाची देखील चर्चा होती. यातच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी देखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे उमेदवारीबाबत रस्सीखेच सुरू होती.

यात शरद पवारांनी पक्षाचे एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे यांच्या मर्जीतील भास्कर भगरे यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. दिंडोरी तालुका अध्यक्ष असलेले भगरे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. त्यामुळे अखेर भास्कर भगरे हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरले आहेत. (latest marathi news)

Dr. Bharti Pawar, Bhaskar Bhagre
Nashik Lok Sabha Election : नाशिक मतदारसंघात सस्पेन्स कायम, इच्छुक उमेदवार नाशकात परतले

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे भास्कर भगरे यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला दिंडोरी लोकसभेत मिळू शकतो. दिंडोरीतील कांदा, ऊस,द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भास्कर भगरे यांच्या नेतृत्वात मोठे शेतकरी आंदोलन देखील झाली.

त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची चर्चा ही संपूर्ण जिल्हाभर होती आणि अखेर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भारती पवार तर, महाविकास आघाडी करून भास्कर भगरे अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची ही लढत तुल्यबळ होईल अशी स्थिती चर्चा सुरू आहे.

भास्कर भगरे कोण आहेत?

भास्कर भगरे हे शरद पवारांच्या विश्वासातील दिंडोरीतील राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. भगरे हे पेशाने शिक्षक आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भास्कर भगरे यांनी अनेक आंदोलन केली आहेत. श्रीराम शेटे यांच्या मर्जीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांपैकी भास्कर भगरे हे एक आहेत. भास्कर भगरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून खेडगाव गटात त्यांनी अनेक विकास कामे केली आहे. तालुका अध्यक्ष पदाचा अनुभव, जिल्हा परिषदेत केलेले कामे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली आंदोलन यातून भास्कर भगरे हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे नेतृत्व म्हणून उद्या आले यातूनच त्यांनाही उमेदवारी दिल्याची पक्षांतर्गत चर्चा आहे.

Dr. Bharti Pawar, Bhaskar Bhagre
Loksabha Election 2024 : भीमशक्तीचा काँग्रेसला पाठिंबा ; चंद्रकांत हंडोरे ,राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com