Nashik Lok Sabha Election : गोडसे, वाजे, भगरे यांच्याकडून माध्यम समितीकडे अर्ज सादर

Nashik : नाशिक लोकसभेतील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगिरी महाराज, दिंडोरीत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी सोशल मीडियावरील प्रचारासाठी रीतसर अर्ज सादर केला.
Application
Application esakal

Nashik News : निवडणूक विभागाची पूर्वपरवानगी न घेताच सोशल मीडियावर सुरू केलेला प्रचार थांबविण्याची नोटीस मिळताच परवानगीसाठी उमेदवारांची भागमभाग झाली. मंगळवारी (ता. ७) नाशिक लोकसभेतील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगिरी महाराज, दिंडोरीत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी सोशल मीडियावरील प्रचारासाठी रीतसर अर्ज सादर केला आहे. (Nashik Lok Sabha Election)

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरू असल्यामुळे सोशल वॉर आत्तापासूनच सुरू झाले आहे. उमेदवारांना स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून प्रचार करण्यापूर्वी माध्यम प्रमाणिकरण समितीची (एमसीएमसी) पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक असते.

मात्र, नाशिकमधील चार व दिंडोरीच्या एका उमेदवाराने रीतसर परवानगी न घेतल्यामुळे त्यांना ४८ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा व अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिले. उमेदवारांना नोटीस मिळताच त्यांच्या प्रतिनिधींनी रीतसर अर्ज माध्यम विभागाकडे सादर केला. (latest marathi news)

Application
Nashik Loksabha News: लोकसभेच्या नाशिकच्या जागेवर ‘राष्ट्रवादी’चा आग्रह

आपल्या अकाउंटवरून चालविण्यात येणारे प्रचाराचे व्हिडिओ, त्यांच्या जाहिराती यांची संपूर्ण माहिती पेनड्राइव्हमध्ये सादर केली. याशिवाय जाहिरातीचा संपूर्ण मजकूर हा लेखी स्वरुपात सादर करण्याची सूचना त्यांना करण्यात आली होती. मात्र, उमेदवारांनी यातही पळवाट शोधल्याचे दिसून येते.

त्यांनी खासगी कंपनीला यासंदर्भातील कंत्राट दिले आहे. त्यांनीच हा मजकूर तयार केल्याचे सांगितले. याशिवाय खर्चाचा तपशील सादर करताना संबंधित कंपनीला दिलेले बिल सादर केले आहे. त्यामुळे उमेदवारांच्या खर्चाची डोकेदुखी कमी झाली असून, रीतसर परवानगीसाठी त्यांना अजून दोन दिवस वाट बघावी लागणार आहे. काही उमेदवारांना उशिरा नोटीस मिळाल्यामुळे बुधवारी (ता. ८) त्यांचा खुलासा प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जाते.

Application
Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com