Lok Sabha Constituency: नाशिकच्या खासदारकीची दोरी सिन्नरकर मतदारांच्या हाती; अधिक मते मिळाल्यास महायुतीची अडचण होणार

Lok Sabha Constituency : लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने सिन्नरला उमेदवारी देऊन पक्षीय राजकारणात सिन्नरचे असलेले महत्त्व अधोरेखित केले आहे.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituencyesakal

Lok Sabha Constituency : लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने सिन्नरला उमेदवारी देऊन पक्षीय राजकारणात सिन्नरचे असलेले महत्त्व अधोरेखित केले आहे. एका बाजूला अद्याप महायुतीला उमेदवार निश्चित करता आलेला नाही. तर आघाडीच्या उमेदवाराने मात्र प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. (nashik lok sabha election mahayuti gets more than two lakh votes it will be problem for in sinnar )

होम ग्राउंडवर आघाडीच्या उमेदवाराने सिन्नरमधून दोन लाखांच्या घरात मते घेतली तर त्याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. कदाचित सिन्नरमध्ये मतांची होणारी फूट भरून काढण्यासाठी उमेदवार निश्चित करताना महायुतीमध्ये मोठा खल होत असल्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेचे साडेतीन मतदारसंघ शहरी भागात तर अडीच मतदारसंघ ग्रामीण भागात आहे.

इगतपुरी- त्र्यंबकमध्ये काँग्रेसचा आमदार, सिन्नर व नाशिक रोड देवळालीमध्ये राष्ट्रवादी, तर नाशिक शहरातील उर्वरित तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. पक्षीय बळाचा विचार केल्यास इगतपुरी बघता उर्वरित चारही आमदार सरकारमध्ये असलेल्या महायुतीचे घटक आहेत. त्यामुळे वरकरणी नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचा प्रभाव आहे असे म्हणावे लागेल. तर या उलट परिस्थिती महाविकास आघाडीची सांगता येईल.

इगतपुरी-त्र्यंबकमधील केवळ विधानसभेची एक जागा आघाडीकडे आहे. असे असले तरी आघाडीतल्या घटकपक्षांनी शहरी उमेदवार देण्यापेक्षा अडीच विधानसभा मतदारसंघ असलेल्या ग्रामीण भागातील उमेदवार देण्याचे धाडस केले आहे. अर्थात ही राजकारणातले चाणक्य म्हटले जाणाऱ्या शरद पवारांची खेळी आहे. सिन्नरचा उमेदवार देताना येथील अधिकाधिक मते आपल्या पदरात कशी पडतील या दृष्टीने विचार करण्यात आला.  (latest marathi news)

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : आघाडीच्या प्रचाराचा धुराळा, महायुतीत घडामोडी; महायुतीची उमेदवारीवर खलबते

सिन्नरमध्ये तीन लाख सहा हजार मतदार असून सिन्नर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व इगतपुरी तालुक्यातील टाकेद गट सिन्नरला जोडलेला आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघात असणारी जास्तीत जास्त मते स्थानिक असलेल्या राजाभाऊ वाजे यांच्या पदरात पडतील असा अंदाज आहे. या ठिकाणी त्यांनी दोन लाखांचा टप्पा गाठला तर महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित नाही, महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून पहिली फेरी पूर्ण झाली आहे. राजाभाऊ वाजेंना ग्रामीण भागातील मतदारांनी स्वीकारले तर महायुतीच्या उशिरा घोषित केलेल्या उमेदवाराची मोठी पंचायत होणार आहे. इगतपुरी, त्र्यंबक, देवळालीसह शहरी भागात असलेले आघाडीचे वर्चस्व वाजेंना आणखी काही प्रमाणात बळ देईल. तर याउलट महायुतीच्या उमेदवाराला सिन्नरमधून वाजेंना मिळणारी मतांची मोठी आघाडी कुठे भरून काढायची असा प्रश्न कायम राहील.

महायुतीकडून येत्या दोन दिवसात त्यांचा उमेदवार निश्चित केला जाईल. मात्र तोपर्यंत महायुतीच्या उमेदवाराची प्रचाराची दुसरी फेरी सुरू झालेली असेल. अर्थात मतदानाच्या दिवसापर्यंत नाशिकमध्ये प्रचाराचा मोठा धुरळा उडेल. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. त्यातून वातावरण निर्मिती होईल. मात्र सिन्नरचे मतदार ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील त्या उमेदवाराला मिळणारी मतांची आघाडी निर्णय असेल हे मात्र नाही.

Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituency : नाशिकच्या जागेसाठी महायुतीचे 3 पर्याय; इच्छुक, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची घालमेल सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com