Nashik Lok Sabha Election : वृद्धांच्या मतदानास प्रारंभ! आजपासून टपाली मतदान

Lok Sabha Election : जिल्ह्यात ८५ वयावरील वृद्ध आणि दिव्यांग मतदारांच्या मतदानास गुरुवारी (ता.९) प्रारंभ झाला. दिंडोरी लोकसभा मतदार संघात चांदवड तालुक्यात मतदान प्रक्रियाही पार पडली.
Chandwad Elderly voters voting in the taluka.
Chandwad Elderly voters voting in the taluka.esakal

Nashik News : जिल्ह्यात ८५ वयावरील वृद्ध आणि दिव्यांग मतदारांच्या मतदानास गुरुवारी (ता.९) प्रारंभ झाला. दिंडोरी लोकसभा मतदार संघात चांदवड तालुक्यात मतदान प्रक्रियाही पार पडली. यात पहिल्याच दिवशी ८८ मतदारांनी घरून मतदान केले. (Lok Sabha Election Voting for elderly started Postal voting from today)

कर्मचाऱ्यांची टपाली मतदान प्रक्रियेस शुक्रवारपासून (ता.१०) नाशिक लोकसभा मतदारसंघात सुरवात होणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण हे शुक्रवारी (ता.१०) सकाळी ९ वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे.

तेथेच टपाली मतदानाची व्यवस्थाही केली आहे. सिन्नर आणि नाशिक पश्चिम मतदारसंघातील कर्मचारी प्रशिक्षण हे ११ मे रोजी सकाळी ९ ते ५ वाजेदरम्यान होणार आहे. याच दरम्यान त्यांचे टपाली मतदानही होईल. त्यानंतर १२ मे रोजी नाशिक पूर्व, देवळाली आणि इगतपुरी या चारही विधानसभा मतदार संघातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अनुक्रमे (स्व.) मीनाताई ठाकरे स्टेडीयम.

दादासाहेब गायकवाड सभागृह आणि रावसाहेब थोरात सभागृह नाशिक या ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान होईल. त्यांचेही तेथेच प्रशिक्षण होईल. सिन्नर मतदार संघासाठी ११ आणि १२ मे रोजी दोन दिवस प्रशिक्षण होणार आहे. (latest marathi news)

Chandwad Elderly voters voting in the taluka.
Nashik Lok Sabha Election : चर्चा नाराजीची मात्र निवडणूकीचा माहोल फिफ्टी-फिफ्टीचा!

त्यांचेही मतदान हे मातोश्री चांडक कन्या विद्यालय सिन्नर येथे होईल. तसेच कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण हे १९ मे रोजी म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी होणार आहे. याच वेळी काही कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान करून घेतले जाणार आहे. या मतपेट्या ४ जून पर्यंत मतमोजणी केंद्रावर पोचविल्या जातील.

आज झालेले मतदान

चांदवड : ३२ (८५ वर्षांवरील) आणि ७ (दिव्यांग मतदार)

निफाड : ४०(८५वर्षांवरील) आणि ९ (दिव्यांग मतदार)

एकूण मतदान : ८८

Chandwad Elderly voters voting in the taluka.
Nashik Loksabha मध्ये भुजबळ फॅक्टर निवडणुकीत किती महत्वाचा ठरणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com