Nashik News : सट्टा बाजारातही पेटली ‘मशाल’; वाजेंना 45, तर गोडसेंचा भाव 55 रुपये

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या उत्कंठेने सट्टे बाजारात निकालाच्या पूर्वसंध्येला जोरदार उसळी घेतली.
Lok Sabha elections betting market soaring on eve of results
Lok Sabha elections betting market soaring on eve of resultsesakal

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या उत्कंठेने सट्टे बाजारात निकालाच्या पूर्वसंध्येला जोरदार उसळी घेतली. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उबाठा पक्षाची मशाल जोरदार पेटलेली दिसून आली. एक्झिट पोलचे निष्कर्ष समोर आल्यानंतर उबाठा पक्षाच्या उमेदवाराला सट्टे बाजारात ४५ रुपये तर शिवसेनेच्या शिंदे गटाला शंभराला ५५ रुपये भाव मिळाल्याची चर्चा आहे. (Lok Sabha elections betting market soaring on eve of results)

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २० मे रोजी पार पडली. त्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. ४) लागणार आहे. निकालाची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. सातव्या टप्प्याचे मतदान १ जूनला पार पडले. त्यानंतर एक्झिट पोलचे निकाल बाहेर पडले. त्यामुळे सर्वसाधारण मतदारांचा कल कुठल्या बाजूने असेल, याचा अंदाज बांधण्यात आला आहे. देशात पुन्हा मोदी सरकार येऊ शकते असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

त्यामुळे शेअर मार्केटमध्ये निर्देशांकाने उसळी घेतली. त्याचप्रमाणे सट्टा बाजारदेखील जोरात आला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे वातावरण असल्याचे एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्येदेखील महाविकास आघाडीला अधिक संधी असल्याचे एक्झिट पोलमधून सांगण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून सट्टे बाजारातदेखील प्रमुख उमेदवारांचे भाव कमी अधिक होताना दिसून येत आहे.

सोमवारी (ता.३) रात्री उशिरा सट्टेबाजारात महाविकास आघाडीचे उमेदवाराला ४५ तर महायुतीच्या उमेदवाराचा भाव ५५ रुपये फुटल्याचे बोलले जाते. महाविकास आघाडीचे उमेदवार मशाल चिन्हावर तर धनुष्यबाणावर महायुतीचे निवडणूक लढवीत आहे. नाशिककर कुठल्या उमेदवाराला कल देत आहे मंगळवारी स्पष्ट होईल. मात्र निकालाच्या पूर्वसंध्येला सट्टे बाजाराने मात्र महाविकास आघाडीचे मशाल पेटविल्याचे दिसून येत आहेत. (latest marathi news)

Lok Sabha elections betting market soaring on eve of results
Nashik News : दत्ता कराळे पुन्हा नाशिक परिक्षेत्राचे ‘आयजी’!

दिंडोरीत महाविकास आघाडीला पसंती

दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्येदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना कमी दर आहे, तर महायुतीच्या उमेदवारांना सर्वाधिक भाव आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये महायुतीकडून प्रचाराचा जोर चांगला वाढला. परिणामी सट्टा बाजारातदेखील त्याच अनुषंगाने भाव वाढल्याचे दिसून येत आहे.

जोखीमवर अधिक सट्टा

सट्टे बाजारात जोखीम हा घटक फार महत्त्वाचा आहे. ज्या घटकांवर कमी भाव लावला जातो. त्या व्यक्तीवर जोखीम कमी असते. अर्थात निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे दर कमी असतो. मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराची जोखीम अधिक असल्याने त्यावर त्यावर अधिक दर लावला जातो. त्यामुळे सट्टे बाजारामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बोलबाला अधिक असल्याचे दिसून आले.

Lok Sabha elections betting market soaring on eve of results
Nashik Police : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरविल्यास कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com