Nashik News : उद्यापासून रंगणार महासंस्कृती महोत्सव; 5 दिवस सोहळ्याची मेजवानी

Nashik : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे बुधवार (ता.२८) पासून पाच दिवस महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने नाशिककरांना विविध कार्यक्रमांची मेजवानीच मिळणार आहे.
Mahasanskruti Mahotsav
Mahasanskruti Mahotsavesakal

Nashik News : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे बुधवार (ता.२८) पासून पाच दिवस महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने नाशिककरांना विविध कार्यक्रमांची मेजवानीच मिळणार आहे. शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात हा महासंस्कृती महोत्सव रंगणार आहे.

महासंस्कृती महोत्सवाचे निमंत्रण केंद्रीय आरोग्य व राज्य मंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह खासदार व आमदारांना देण्यात आले आहे. (Nashik Mahasanskruti Mahotsav will be held from tomorrow)

स्थानिक कलावंतांसह सिनेनाटय कलावंतांकडून गीते, नाटक यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांना प्रवेश विनामूल्य असून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केले.

बुधवारी (ता. २८) सायंकाळी ४ ते ५ या वेळेत महासंस्कृती महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता वैशाली प्रॉडक्शन प्रस्तुत ‘लेकी जिजाऊंच्या’ हा कार्यक्रम होईल.

Mahasanskruti Mahotsav
Nashik ZP News : प्रशासक आज सादर करणार अंदाजपत्रक

त्यानंतर हभप निवृत्ती चव्हाण महाराज यांचे कीर्तन व ६ ते १० या वेळेत सागर कारंडे, संदीप गायकवाड, माधवी निमकर, आकांक्षा कदम इतर कलाकार यांच्यातर्फे महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम सादर होणार आहे.

याच पद्धतीने पुढील चारही दिवस विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर होतील. तसेच शंभर कलाकारांचा समावेश असलेल्या ‘मी सह्याद्री बोलतो’ या शिवराज्याभिषेक सोहळ्याने महोत्सवाची सांगता होणार असल्याचे तहसीलदार मंजूषा घाटगे यांनी सांगितले.

Mahasanskruti Mahotsav
Nashik Adivasi Morcha: आंदोलनात आलेल्या एकाचा दुर्दैवी मृत्यु; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली चक्कर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com